Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Month: January 2025

खेलरत्न पुरस्कार

खेलरत्न पुरस्कार

दोनऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेश यांच्यासह चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ हा देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेचअर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या 32 खेळाडूंमध्ये विक्रमी 17 पॅरा-खेळाडूंचा समावेश आहे. खेलरत्नपुरस्कारासाठी पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-उंच उडीपटू प्रवीण कुमार यांचीही निवड करण्यात आली आहे. विजेत्याखेळाडूंना 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 22 वर्षीयमनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली खेळाडू ठरली. तिनेऑगस्ट 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात कांस्यपदक मिळवले. मेजर ध्यानचंद खेलरत्न मनूभाकर (नेमबाजी) दोम्माराजूगुकेश (बुद्धिबळ) हरमनप्रीतसिंग (हॉकी) प्रवीणकुमार (पॅरा-अॅथलेटिक्स) अर्जुन पुरस्कार ज्योतीयाराजी (अॅथलेटिक्स)...

Read More
नवीन वर्ष (2025) सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित

नवीन वर्ष (2025) सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित

संरक्षणमंत्रालयाने नवे वर्ष सुधारणांचे वर्ष म्हणून जाहीर केले आहे. सायबरअन् अवकाश युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, रोबोटिक्स, हायपरसोनिक टेक्नोलॉजी यांसारख्या नव्या क्षेत्रांवर तसेच वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानावर नव्या वर्षात लक्ष केंद्रित केले जाईल. लष्कराचेआधुनिकीकरण, लष्करी क्षमतेचा विकास आणि अधिग्रहण प्रक्रियेत सुलभता आणण्यासह इतर मुद्द्यांवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तांत्रिकदृष्ट्याप्रगत, प्रत्येक प्रकारचे  आणि स्तरावरचे युद्ध हाताळण्याची क्षमता असलेले सैन्यबळ तयार करण्याचे लष्कराचे उद्दिष्ट आहे. संरक्षणक्षेत्राची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहे. दशकभरापूर्वीदोन हजार कोटी रुपयांवर असलेली भारताची संरक्षण निर्यात आता 21 हजार कोटी रुपयांवर गेली आहे. वर्ष2029 पर्यंत निर्यातीचा आकडा 50 हजार कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य आहे. आर. वैशाली कांस्य पदकाची मानकरी कोनेरूहम्पीनंतर भारताच्या आर. वैशालीने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली आहे....

Read More
इस्रो स्पेस डॉकिंगच्या दिशेने

इस्रो स्पेस डॉकिंगच्या दिशेने

भारतीयअवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘स्पेस डॉकिंग’ या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग हाती घेतला आहे. तो यशस्वी झाला, तर अमेरिका, चीन, रशिया या देशांच्या रांगेत भारताला स्थान मिळेल. 7 जानेवारीच्याआसपास या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ‘पीएसएलव्हीसी 60 स्पाडेक्स’ मोहीम यशस्वी झाल्याची माहिती मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी दिली. रॉकेटने475 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत उपग्रहांना यशस्वीपणे नेले. पंधरामिनिटांच्या उड्डाणानंतर उपग्रहे नियोजित कक्षेत पोहोचली. स्पाडेक्सउपग्रह एकामागोमाग एक कक्षेत गेले. काही काळानंतर दोन्ही उपग्रह एकमेकांपासून अधिक अंतरावर असतील. त्यानंतर ‘स्पेस डॉकिंग’चा प्रयोग सुरू होईल. हीप्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे....

Read More