- पुणे स्थित लष्कराच्या दक्षिण कमांड ने वर्ष 2047 हे निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे.
- वर्ष 2070 पर्यंत ‘नेट झिरो भारत’ अर्थात निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारा भारत असा दर्जा प्राप्त करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाशी सुसंगत एका प्रमुख घडामोडीत पुणे स्थित लष्कराच्या दक्षिण कमांडने, स्वतंत्र भारताच्या शतक महोत्सवाच्या अनुषंगाने 15 ऑगस्ट 2047 पर्यंत ‘नेट झिरो सदर्न कमांड’ दर्जा प्राप्त करण्याचा अग्रगण्य उपक्रम हाती घेतला आहे.
- दक्षिण कमांड चे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह यांनी हे दूरदर्शी ध्येय साध्य करण्यासाठी, प्रमाणित विषय तज्ञांशी सल्लामसलत करून, कार्बन फूटप्रिंटचा तपशीलवार अभ्यास करण्याची जबाबदारी दक्षिण कमांडकडे सोपवली.
- या अभ्यासात कार्बन डायऑक्साइड (C02) उत्सर्जनाचे मॅपिंग आणि देशाच्या एकूण भूभागाच्या जवळपास 40% भागांचा समावेश असलेल्या दक्षिण कमांड अधिकार क्षेत्रातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण समाविष्ट आहे.
- आंतरराष्ट्रीय नियम आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास गटाच्या (यूएनएसडीजी) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अंदाजाद्वारे (एक्स्ट्रापोलेशनद्वारे) हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
- कार्बन उत्सर्जन कमी करण्याकरिता धोरण सक्षमीकरणाद्वारे निर्धारित केलेले उद्दिष्ट साध्य करून मोहीम यशस्वी व्हावी याकरिता त्यांचा तपशीलवार अभ्यास केला गेला आहे.
- उत्सर्जनात साध्य झालेल्या कपातीचे लेखापरीक्षण करण्यासाठी दक्षिण कमांड मूल्यांकन वर्ष 2025 ते 2047 पर्यंत ‘वार्षिक निव्वळ शून्य शाश्वत अहवाल’ प्रकाशित करेल.