- जागतिक योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो.
- योग दिन साजरा करण्यामागचा उद्देश योगाचे महत्त्व जाणून त्याद्वारे निरोगी राहणे हा आहे.
- योगाने व्यक्ती निरोगी राहू शकतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक आजारांपासूनही दूर राहू शकतो.
- प्राणायाम आणि योगासने सतत केल्याने शरीर पूर्णपणे लवचिक आणि तंदुरुस्त बनते.
- आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 थीम: “स्व आणि समाजासाठी योग”
- संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.
- 21 जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये आणि संस्कृतींमध्ये 21 जूनला विशेष महत्त्व आहे.
10 वा योग दिन
- आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 हा 21 जून 2024 रोजी साजरा केला जाईल. हा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 10 वा संस्करण असेल , जो पहिल्यांदा 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने स्थापन केला होता आणि 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा साजरा केला गेला होता.
- भारतात शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, श्रीनगर, जम्मू-काश्मीर येथे पंतप्रधानांच्या उपस्थित या वर्षाचा योग्य दिन साजरा केला जात आहे