भारतामध्ये प्रसिद्ध गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून दर वर्षी 22 डिसेंबर रोजी साजरी केली जाते. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर, 1887 साली झाला. 2023 मध्ये राष्ट्र त्यांची 136 वी जयंती साजरी करीत आहे.
पार्श्वभूमी
• 22 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय गणित म्हणून साजरा करावा असे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 2012 साली जाहीर केले.
• तेव्हापासून भारतात 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.
• मराठी विज्ञान परिषदेत 2013 सालापासून गणित दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
उद्देश
• हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे.
• या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गणिताच्या स्पर्धा घेतल्या जातात.
• विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रवृत्त केले जाते.
श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी…
• श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडूमधील इरोड येथील तमिळ ब्राह्मण अय्यंगार कुटुंबात झाला.
• रामानुजन यांनी कुंभकोणम येथील शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेतले. मात्र त्यांना गणित शिवाय इतर विषयात रस नसल्याने ते बारावीच्या परीक्षेत नापास झाले. ज्या शाळेत ते बारावीत दोनदा नापास झाले, ती शाळा आता रामानुजन यांच्या नावावर आहे.
• रामानुजन यांनी वयाच्या 12 व्या वर्षी त्रिकोणामितीमध्ये प्रभुत्व मिळवले होते. त्यांनी अनेक प्रमेये विकसित केली. अनेक सूत्रांचा शोध लावला. त्याच्या आश्चर्याने जगभरातील गणितज्ञ आश्चर्यचकित झाले.
• 1912 मध्ये त्यांनी मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांची गणिती प्रतिभा सर्वांनी ओळखली आणि त्यांना केंब्रिज विद्यापीठ, ट्रिनिटी कॉलेजमध्ये पाठवले.
• 1916 मध्ये त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. 1917 मध्ये लंडनच्या मॅथेमॅटिकल सोसायटीवर त्यांची निवड झाली.
• 1918 मध्ये रामानुजन केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटी, रॉयल सोसायटी आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजचे फेलो म्हणून निवडले गेले. 1919 मध्ये ते भारतात परतले.
• श्रीनिवास रामानुजन यांचे 26 एप्रिल 1920 रोजी क्षयरोगामुळे (33 वर्षे) निधन झाले.