वाचन- प्रकाशन- स्वामित्व हक्क याबाबत विद्वानांपासून जनसामान्यांपर्यंत जागृती करण्यासाठी 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो .
थीम –
जागतिक पुस्तक दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. या वर्षाची – 2023 ची थीम ‘Indigenous Languages’ आहे. देशात आणि जगात सध्या असलेल्या विविध भाषांचे महत्त्व समजून घेणे हा ह्या थीम चा मुख्य उद्देश आहे
पार्श्वभूमी:
मिग्यूएल द सर्व्हनिस, इंका गार्सीलिसो, विल्यम शेक्सपियर या महान लेखकांच्या स्मरणार्थ युनोस्कोने जागतिक पुस्तक दिन हा दिवस 23 एप्रिल 1995 पासून साजरा करायला सुरुवात केली
आज शंभरहून अधिक देशांत तो साजरा केला जातो
युनेस्कोने माद्रिद ही पहिली जागतिक ग्रंथ राजधानी म्हणून जाहीर केली .
‘अक्रा‘ ही 2023 ची जागतिक पुस्तक दिनाची राजधानी
2023 यावर्षी पश्चिम आफ्रिकेतील घाना येथील अक्रा हे शहर युनोस्कोने जागतिक पुस्तक दिनाची राजधानी म्हणून जाहीर केले आहे
2022 मध्ये मेक्सिको मधील ग्वाडालजारा हे शहर जागतिक पुस्तक राजधानी होते
महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील भिलार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते