24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा केला जातो
2023 हे पंचायत राज दिनाचे 13 वे वर्ष आहे
कधीपासून साजरा करण्यात येतो?
पहिला पंचायत राज दिन भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2010 मध्ये साजरा करण्यात आला होता
24 एप्रिल 1992 रोजी संविधानातील 73 वी घटनादुरुस्ती लागू झाली होती त्या कारणाने 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून निवडण्यात आला
राष्ट्रीय पंचायती राज दिवसाचा इतिहास
पंचायत हे भारतीय समाजाचे मूलभूत वैशिष्ट्य राहिले आहे. महात्मा गांधींनी पंचायती आणि ग्राम प्रजासत्ताकांचा पुरस्कार केला .
स्वातंत्र्य मिळाल्यापासून, 1992 च्या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतामध्ये वेळोवेळी पंचायतींच्या अनेक तरतुदी केल्या होत्या.
भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. पंचायत हा शब्द संस्कृत शब्द ‘पंच’ (म्हणजे पाच) आणि ‘आयत’ (म्हणजे विधानसभा) पासून आला आहे. भारतामध्ये मौर्य काळात सुमारे ३०० ई स पूर्व पंचायत व्यवस्था प्रचलित होती. या काळात प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही रूढ होती.
आधुनिक भारतात, जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने १९५९ मध्ये प्रथम पंचायती राज व्यवस्था सुरू केली.
पंचायत राज दिनी देण्यात येणारे विवध पुरस्कार
दरवर्षी २४ एप्रिल या राष्ट्रीय पंचायती राज दिनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या पंचायती/राज्य/केंद्रशासित प्रदेशांना 5 श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले जातात.
दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तिकरण पुरस्कार, नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार, ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार, बालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कार आणि केवळ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी ई-पंचायत पुरस्कार हे पुरस्कार आहेत.