Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

25 एप्रिल : जागतिक मलेरिया दिन

मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होणारा रोग आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी मलेरिया नियंत्रित करण्यासाठी पाळण्यात येतो.

जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 60 व्या सत्रामध्ये मे 2007 मध्ये हा दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. मलेरियाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा ‘जागतिक मलेरिया दिन’ म्हणून ओळखला जातो.

2023 ची संकल्पना:

मलेरिया मुक्तीसाठी गुंतवणूक करणे, कल्पना, योजना आणि अंमलबजावणी करणे

मलेरिया

‘प्रोटोजुअन प्लाज्‍मोडियम’ (Protozoan Plasmodium) नावाच्या कीटाणूच्या मादी एनोफिलीस डासापासून मलेरिया (Malaria) होतो.

आजवर या आजाराने जगभरात अनेकांचे बळी घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)  या विषाणूचे वर्णन साथीचा आजार असे केले आहे.

जागतिक मलेरिया दिन हा मलेरिया प्रतिबंध, नियंत्रण आणि या आजाराचे निर्मूलन या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य संघटनेने 2008 मध्ये सर्वप्रथम हा दिवस साजरा केला. (घोषणा -2007)

मलेरिया आजाराची लक्षणं

डास चावल्यानंतर आठ दिवसाने मलेरियाची लक्षणं सुरू होतात. यामध्ये ताप येणे, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे ही मलेरियाची लक्षणं आहेत.

मलेरियाची आजची स्थिती:

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 च्या अहवालानुसार आग्नेय आशिया प्रदेशातील देशांपैकी सुमारे 2 % मलेरिया रुग्ण हे भारतात आहेत. तसेच मागील तीन वर्षांतील या प्रदेशातील मलेरिया मृत्यूपैकी सुमारे 82 % मृत्यू भारतात झाले आहेत.

जागतिक स्तरावर मलेरिया या आजाराचे प्रमाण सुमारे 17% आहे.

2019 च्या अहवालानुसार जगातील मलेरियाच्या रूग्णांपैकी 3 % रुग्ण भारतात होते.

भारताने 2023 पर्यंत मलेरिया मुक्त होण्याचे तर 2030 पर्यंत मलेरिया संपूर्ण निर्मूलन करण्याची उद्दिष्टे निश्चित केले आहे .

जगाच्या इतर भागाच्या तुलनेत आफ्रिकन देशांमध्ये मलेरियाच्या अस्तित्व आजही सर्वाधिक आहे . सध्या श्रीलंका, मालदीव आणि चीन या देशाने मलेरिया मुक्तीचे उद्दिष्ट साध्य केले आहे .

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *