सतराव्या शतकात हौतात्म्य पत्करलेल्या चार साहिबजादांच्या (शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंद सिंग यांचे चार पुत्र होते) शौर्याला श्रद्धांजली म्हणून 26 डिसेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो. 2022 या वर्षापासून हा दिवस साजरा करण्यात येतो. 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. 9 जानेवारी 2022 रोजी शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंद सिंग जी यांच्या जयंती निमित्त मोदींनी ही घोषणा केली होती.
26 डिसेंबरच का?
• साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग हे शीख धर्मातील सर्वात आदरणीय हुतात्म्यांपैकी एक होते.
• इ. स.1704 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशानुसार मुघल सैनिकांनी आनंदपुर साहिबला वेढा घातला होता. यात गुरुगोविंदसिंगाचे साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेहसिंग हे दोन पुत्र पकडले गेले.
• या दोघांना मुस्लिम धर्म स्वीकारला तर सुटका केली जाईल असा प्रस्ताव देण्यात आला मात्र या दोघांनी नकार दिला म्हणून 26 डिसेंबर रोजी त्यांना वयाच्या अनुक्रमे सहा आणि नऊ यावर्षी औरंगजेबाच्या मोघल सैन्याने भिंतीत जिवंत गाडले.