26 लाखांहून अधिक तरुणांनी ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी केली आहे. माय भारतच्या माध्यमातून राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागांशी सल्लामसलत करून युवा पोलीस अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
अधिक माहिती
● माय भारताची कल्पना युवा विकास आणि युवकांभिमुख विकासासाठी एक महत्त्वपूर्ण, तंत्रज्ञान-चालित सुलभकर्ता म्हणून केली गेली आहे.
● यात तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि सरकारच्या संपूर्ण क्षेत्रात ‘विकसित भारत’ निर्मितीसाठी योगदान देण्यासाठी न्याय्य संधी प्रदान करण्याचे व्यापक उद्दिष्ट आहे.
● देशभरातील युवक माय भारत पोर्टलवर (https://www.mybharat.gov.in/) नोंदणी करू शकतात आणि त्याच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध संधींसाठी नोंदणी करू शकतात.
● मेरा युवा भारत मंचाचे उद्दिष्ट तरुण व्यक्तींना समुदाय परिवर्तनासाठी उत्प्रेरक बनण्यासाठी सक्षम करण्यासाठी एक संमिश्र (भौतिक + डिजिटल) परिसंस्था तयार करणे हे आहे.
● डिजिटल जाळे उपलब्ध झाल्याने आणि स्वयंसेवी संधींशी जोडले गेल्याने, युवक हे समुदाय परिवर्तनाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रनिर्माते बनतील.
● त्यामुळे ते सरकार आणि नागरिकांमध्ये युवा सेतू म्हणून काम करू शकतील.