- दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन 28 जुलै रोजी साजरा केला जातो.
- हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी साजरा करण्यात येतो.
- या दिवशी नैसर्गिक संसाधनाचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षणावर जास्त भर दिला जातो.
- जागतिक निसर्ग संवर्धन दिन 2024 ची थीम : “लोक आणि वनस्पती जोडणे, वाइल्डलाइफ संवर्धनात डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोअर करणे.”
जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे महत्त्व
- अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहे.
- जागतिक तापमान वाढ, ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण आणि नैसर्गिक समतोल बिघडत आहेत.
- त्यामुळे अशा परिस्थितीत निसर्गाचे संरक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होईल.
- या दिवशी निसर्ग समजून घेऊन त्याच्या हितासाठी कार्य करणे महत्तवेचे असून अनेकजण जागृकता निर्माण करण्याचे काम करतात. यासाठी जगभरात विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात.