सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन(3 जानेवारी) हा स्त्रीमुक्ती दिन ,बालिका दिन तसेच ‘महिला शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
सावित्रीबाई फुले यांच्या विषयी
● जन्म: 3 जानेवारी 1831, नायगाव जि. सातारा
● वडिलांचे नाव : खंडोजी नेवसे (पाटील)
● आईचे नाव: सत्यवती नेवसे
● महाराष्ट्रातील तसेच भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका
● महात्मा फुले यांनी 1848 यावर्षी पुण्यात बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
● या शाळेत सावित्रीबाई फुले शिक्षिका होत्या.
● सावित्रीबाईंचे कार्य हे स्त्रीशिक्षणापुरतेच मर्यादित नाही तर स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्यतेविरुद्धही त्यांनी कार्य केले.
● अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला.
● त्यांनी ‘महिला सेवा मंडळ’ काढले होते व स्वतःच त्या सचिव होत्या.
● 1852 या वर्षी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पत्नी इ.सी. जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली तिळगुळाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता.
● या कार्यक्रमात त्यांनी जातीभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखीच हळदीकुंकू लावण्यात येईल आणि तिळगुळ वाटण्यात येईल अशा स्वरूपाची पत्रिका प्रसिद्ध केली होती .
● या पत्रिकेस मान देऊन सर्व जातींच्या स्त्रिया त्या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
● या कार्यक्रमातून जाअंताचा त्यांनी संदेश दिला.
● 1893 या वर्षी सत्यशोधक समाजाच्या 20 व्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले होते.
● 2015 या वर्षी पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले.


