- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा राज्यात मडगाव येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
- 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत या क्रीडा स्पर्धा होणार असून यामध्ये 28 स्थानांवर होणाऱ्या 43 क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील दहा हजार पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील.
- पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशातील क्रीडा संस्कृतीत मोठा बदल झाला आहे. केंद्र सरकारच्या सातत्त्यपूर्ण मदतीमुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि खेळांची लोकप्रियता वाढवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाचे महत्त्व ओळखून, देशात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत.
- गोव्यामध्ये प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
- 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत या क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
- देशभरातील 10,000 पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहे.
- विविध 28 ठिकाणी आयोजित केलेल्या 43 हून अधिक क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांमध्ये हे खेळाडू सहभागी होतील.
- मोटो :- “गेट सेट गोवा”
- 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा(2022) गुजरात मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.


