38 वी अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा
- केंद्रीय खाण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या सेमीनरी हिल्स स्थित भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण – जीएसआय, मध्य क्षेत्र, 5 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जीएसआय कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स येथे 38 वी अखिल भारतीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आले असून उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंदर सिंगल आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय डांगरे उपस्थित राहणार आहेत.
- संपूर्ण भारतातील जीएसआयच्या विविध क्षेत्रांमधून एकूण 80 खेळाडूंचा समावेश असलेले एकूण 7 संघ या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
- ही व्हॉलीबॉल स्पर्धा जीएसआय नागपूरचे अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख डी. व्ही. गणवीर, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे संयोजक डॉ. एस. आर. बसीर, उपमहासंचालक हे आहेत.
- भूवैज्ञानिक सर्वेक्षण कार्यालय हे 1851 पासून खनिज उत्खननात कार्य करत आहे.