48 वा केमेक्सील निर्यात पुरस्कार
- मुंबईत 48 वा केमेक्सील निर्यात (CHEMEXCIL Export) पुरस्कार सोहळा पार पडला.
- केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
- केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी या कार्यक्रमात भारताच्या रसायने निर्यातीला चालना देण्यात मूलभूत रसायने, सौंदर्यप्रसाधने आणि रंग निर्यात प्रोत्साहन परिषदेची (CHEMEXCIL) महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.
- भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 1963 मध्ये स्थापन केलेली केमेक्सील ही संस्था रंग, इंटरमीडिएट्स रंग, अजैविक आणि सेंद्रिय रसायने, कृषी रसायने, सौंदर्यप्रसाधने, प्रसाधनसामग्री, आवश्यक तेले आणि एरंडेल तेल यासारख्या इतर उत्पादनांचा जागतिक व्यापार सुलभ करते.
- एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत केमेक्सील द्वारे झालेली एकूण निर्यात34 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
- एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत, निर्यात20 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील 20.24 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा 4.76 % नी अधिक आहे. केमेक्सील ने 2024-25 या कालावधीसाठी 31.53 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- रसायने क्षेत्र हे सर्वात वेगाने वाढणाऱ्या भारतीय उद्योगांपैकी एक आहे. भारतात उत्पादित होणाऱ्या बहुतेक रसायनांमध्ये अपस्ट्रीम उत्पादने किंवा इंटरमीडिएट्स असतात.
- ही उत्पादने खते, औषधनिर्माण, कापड आणि प्लास्टिक, कृषी रसायने, रंग आणि रंग उत्पादने इत्यादी विविध उत्पादन अनुप्रयोगांमध्ये वापरले जातात.
- भारत रसायनांचा जगातील सहावा सर्वात मोठा तर आशिया खंडात तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश असून हा उद्योग भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) मध्ये 7% योगदान देतो.
- भारतीय रसायने उद्योगाचे सध्याचे मूल्य 220 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे आणि 2030 पर्यंत ते 300 अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि 2040 पर्यंत 1 लाख कोटी (ट्रिलियन) अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
- जागतिक स्तरावर, भारत हा अमेरिका, जपान आणि चीन नंतर कृषी रसायनांचा चौथा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
- जगातील रंगद्रव्ये आणि इंटरमीडिएट्स रंग यांच्या उत्पादनात भारताचा वाटा 16-18% आहे.
- भारतीय रंगद्रव्ये उद्योग हा एक प्रमुख उद्योग म्हणून उदयास आला असून त्याचा जागतिक बाजारपेठेतील वाटा सुमारे 15% आहे.
- 200 कोटींहून अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या एकूण जागतिक रसायने उद्योगात भारतीय रसायनांचा वाटा8 ते 3% आहे.
- भारतीय रसायने उद्योगासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रमुख रसायनांसाठी 2025-26 या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शुल्क सवलत देण्यात आल्याचे केमेक्सील चे अध्यक्ष अभय उदेशी यांनी स्वागत केले.
- 65% रसायने कंपन्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असल्याने, अर्थसंकल्पातील वाढीव पत हमी तसेच तांत्रिक सुधारणा आणि क्षमता बांधणीसाठी भांडवलाची अधिक उपलब्धता यासारखे भरीव पाठबळ दिले आहे.
- आरती इंडस्ट्रीजचे चंद्रकांत गोगरी यांना लाईफ टाईम आचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले(2020-21)