Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

5 जून : जागतिक पर्यावरण दिन (JUNE 5 : WORLD ENVIRONMENT DAY)

  • Home
  • Current Affairs
  • 5 जून : जागतिक पर्यावरण दिन (JUNE 5 : WORLD ENVIRONMENT DAY)

प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात 5 जुन रोजी जनतेमध्ये पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी,संपुर्ण जगाला पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वाना प्रेरित करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाविषयी जगभरात प्रबोधन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
5 जून 2023 रोजी 49 वा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.
थीम- 2023:

Solutions to Plastic Pollution’ (प्लास्टिक प्रदूषणावर उपाय)

थीम – 2022

Only One Earth
उद्देश:

जगातील प्रदूषणाची पातळी दररोज वाढत आहे. प्रदूषणाची वाढती पातळी निसर्गासाठी घातक आहे. हे कमी करण्यासाठी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
सुरवात:

पर्यावरण दिवस साजरा करावयास सर्वप्रथम 1972 मध्ये संयुक्त राष्टाकडुन आरंभ केला गेला होता.तेव्हापासुन दरवर्षी संपूर्ण जगभरात 5 जुन रोजी पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
1972 मध्ये स्टॉकहोम येथे एक पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती,हीच परिषद जगातील पहिली पर्यावरण परिषद म्हणुन ओळखली जाते. ज्यामध्ये तब्बल 120 देशांनी आपला सहभाग नोंदवला होता.
भारतही पर्यावरणाबाबत गंभीर :

भारतातही 19 नोव्हेंबर 1986 रोजी पर्यावरण संरक्षण कायदा लागू करण्यात आला.

जगभरात पर्यावरण दिन कशाप्रकारे साजरा केला जातो?

शाळा महाविद्यालयामध्ये ह्या दिवशी विविध सांस्कृतिक तसेच पर्यावरण विषयक जागृती निर्माण करत असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
विदयार्थ्यांसाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज पर्यावरण संवर्धनाचे महत्व इत्यादी अशा पर्यावरणाचे महत्व पटवून देत असलेल्या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सगळयांमध्ये जागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये रँली काढुन पर्यावरण संवर्धन विषयी घोषणा केल्या जातात.
पर्यावरण संवर्धनाविषयी जागोजागी भिंतींवर घोषवाक्ये लिहीली जातात.पोस्टर लावले जातात.शाळा महाविद्यालयात पर्यावरणाचे महत्व विदयार्थ्यांना पटवून देण्यापुरता एखादी एकांकिका तसेच नाटक आयोजित केले जाते.
आजुबाजुचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी एखादी खास मोहीम राबवली जाते.
अशा वेगवेगळया प्रकारे जागोजागी पर्यावरण दिवस साजरा केला जातो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *