दरवर्षी 5 डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याचा मुख्य उद्देश लोकांना मातीचं महत्व सांगणे हा आहे.वाढत्या लोकसंख्येमुळे मातीची धूप कमी करण्यासाठी, सुपीक माती आणि संसाधन म्हणून मातीचा शाश्वत वापर याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी अन्न आणि कृषी संस्थेद्वारे दरवर्षी 5 डिसेंबर रोजी ‘जागतिक मृदा दिन’ साजरा केला जातो.
जागतिक मृदा दिनाचा इतिहास
• 2002 मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेस (IUSS) ने जागतिक मृदा दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती.
• FAO परिषदेने 20 डिसेंबर 2013 रोजी 68 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत एकमताने याबाबत अधिकृत घोषित केलं. 5 डिसेंबर 2014 रोजी पहिला जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
• थायलंडचे महाराज भूमिबोल अदुल्यादेज यांनी आपल्या कार्यकाळात सुपीक जमिनीचे संरक्षण करण्यासाठी खूप काम केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून समर्पित करून त्यांचा गौरव केला जातो. यानंतर दरवर्षी 5 डिसेंबरला मृदा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
जागतिक मृदा दिन 2023 चे महत्त्व
• माती आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चार प्रमुख जीवन साधनांचा स्रोत आहे. त्यामुळे त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
• वृक्षतोडीच्या अतिरेकामुळे त्यांची संख्या तर कमी होत आहेच, पण मातीला बांधून ठेवणाऱ्या झाडांची मुळेही कमी होत आहेत.
• झाडे कमी झाल्यामुळे पूर, अतिवृष्टी किंवा वादळी वारे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे सुपीकता वाहून जाते. त्यांच्यासोबत माती जात आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
• 2023 ची जागतिक मृदा दिनाची थीम :- ‘माती आणि पाणी, जीवनाचा स्रोत ‘


