अमेरिकेतील युनायटेड लाँच अलायन्स या कंपनीच्या ‘व्हल्कन’ या रॉकेटचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेट द्वारे एस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजी या कंपनीचे लॅन्डर अवकाशात पाठविण्यात आले आहे. सुमारे 50 वर्षांच्या खंडानंतर अमेरिकेने चंद्र मोहीम आखली आहे.
अधिक माहिती
● अमेरिकेमध्ये सध्या अवकाश क्षेत्रामध्ये खासगी कंपन्यांच्या सहभागासाठी प्रोत्साहन देत आहे.
● ‘व्हल्कन’रॉकेटचे फ्लोरिडा येथील अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले .त्यातील लँडर हा 23 फेब्रुवारीला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचे नियोजन आहे.
● ही मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्रावर यान अथवा लॅण्डर उतरविणारी एस्ट्रोबॉटिक टेक्नॉलॉजी ही खाजगी क्षेत्रातील पहिली कंपनी असेल.
● अशी कामगिरी आतापर्यंत केवळ चार देशांच्या सरकारी अवकाश संस्थाना शक्य झाली आहे.
● या मोहिमेसाठी एस्ट्रोबॉटिक टेक्नॉलॉजी आणि युनायटेड लाँच अलायन्स या कंपन्यांना नासाने मदत केली आहे.
● चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्याचे अखेरची मोहीम अमेरिकेने 1972 मध्ये आखली होती.
● नासाच्या ‘अपोलो 17’ या यानातून गेलेल्या जीनी कार्णन आणि हॅरिसन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते.
● चंद्रावर पाऊल ठेवणारे ते अनुक्रमे 11 वे आणि 12 वे व्यक्ती ठरले होते.