Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

हिंगोली जिल्ह्यात उभारली जाणार भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

  • Home
  • Current Affairs
  • हिंगोली जिल्ह्यात उभारली जाणार भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय वेधशाळा

गुरुत्व लहरींचा अभ्यास करणा-या ‘लेसर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरी (लायगो) या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वेधशाळेची उभारणी २०२५ पर्यंत पुर्ण करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जगभरातील विविध संशोधन संस्था व विद्यापीठांचे सहकार्य मिळणार आहे.

जगातील तिसरी वेधशाळा :

  • अमेरिकेमध्ये दोन लायगो वेधशाळा यापुर्वीपासून गुरुत्वीय लहरींचा वेध घेत आहेत. त्यामुळे भारतात होणारी ही अमेरिकेबाहेरील पहिली व जगातील तिसरी वेधशाळा ठरणार आहे.
  • महाराष्ट्रतील हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ जवळ तब्बल 2600 कोटी रुपये खर्चून सन 2025 पर्यंत   ही वेधशाळा ‘लायगो इंडिया’ नावाने उभारली जात आहे
  • गुरुत्वीय लहरींच्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या संशोधनास चालना मिळतानाच भारतातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निर्मिती ‘लायगो इंडिया’ मुळे शक्य होणार आहे
  • अमेरिकेतील ‘लायगो’ च्या जुळ्या वेधशाळांनी लावलेल्या गुरुत्वीय लहरींच्या पहिल्या शोधानंतर भारतातील पहिली वेधशाळा उभारण्यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये तत्वत: मंजुरी दिली होती .

 असा असेल लायगो इंडियाचा प्रकल्प:

  • अमेरिकेतील लायगोच्या दोन वेधशाळानंतर(हॅनफोर्ड साईट, वॉशिंग्टन आणि लिविंगस्टन, लुईझीयाना) तिसरी वेधशाळा उभारण्यासाठी पृथ्वीवर अमेरिकेच्या विरुद्ध बाजू असणाऱ्या भारताची निवड करण्यात आली.
  • वेधशाळेसाठी निश्चित करण्यात आलेली औंढ्या नागनाथ जवळील जागा अमेरिकेतील जागांपेक्षा दहा पटींनी अधिक स्थिर आहे.
  • अतिदूर अवकाशातील ब्लॅकहोल,  न्यूट्रॉन तारे यांच्या संमेलनातून अवकाश आणि काळाच्या पटलावर निर्माण झालेल्या तरंगांचा वेध घेण्याचे काम वेधशाळा करील
  • पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रो फिजिक्स (आयुका), इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रिसर्च (गांधीनगर) आणि राजा राजा रामन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी (इंदूर) या संस्थांच्या पुढाकाराने चार किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असणारी वेधशाळा उभारण्यात येईल.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *