महाराष्ट्र शासनाच्या वतीने 6 जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
अधिक माहिती
● बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे.
● त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते.
● जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
● भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
● 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला.
● जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ मराठी भाषेत काढण्यात आले.
बाळशास्त्री जांभेकर
● आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 यावर्षी पोंबर्ले या ठिकाणी झाला होता.
● आद्य इतिहास संशोधक, मराठी वृत्तपत्राचे जनक तसेच श्रेष्ठ पत्रकार आणि शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना ओळखले जाते.
● मराठी सहित संस्कृत ,बंगाली, फारसी, इंग्रजी, गुजराती या भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.
● मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले होते .
● ‘दिग्दर्शन’ या नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले होते.
● शून्यलब्धी, हिंदुस्तानचा इतिहास ,हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास ,सारसंग्रह, इंग्लंडचा इतिहास, इ. ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे.


