67 वा ग्रॅमी पुरस्कार 2025
- संगीतातील विशेष योगदानाबद्दल दिला जाणारा जागतिक प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार भारतीय-अमेरिकी गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन यांना ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी जाहीर झाला.
- ‘बेस्ट न्यू एज’, ‘अॅबियंट किंवा चॅट’ अल्बम श्रेणीत त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
- प्रसिद्ध अमेरिकी रॅपर-हिपहॉप कलाकार केंड्रिक लामारने ‘नाट लाईक अस’ या अल्बमसाठी तब्बल पाच श्रेणींमध्ये पुरस्कार मिळविले.
- बियॉन्से ‘काऊबॉय कार्टर’ साठी अल्बम ऑफ द इयर हा सर्वांत महत्त्वाचा पुरस्कार जिंकला. त्याबरोबरच सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम जिंकणारी ती पहिली कृष्णवर्णीय कलाकार ठरली.
ग्रॅमी पुरस्कार
- ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे.
- ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार
- पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा :4 मे 1959
- पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांना 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.
- 2013 मध्ये त्यांना ग्रॅमी लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.