Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

7 जून : जागतिक अन्न सुरक्षा दिन (JUNE 7: WORLD FOOD SECURITY DAY)

  • Home
  • Current Affairs
  • 7 जून : जागतिक अन्न सुरक्षा दिन (JUNE 7: WORLD FOOD SECURITY DAY)

जागतिक अन्न सुरक्षा दिन (World Food Safety Day) दरवर्षी 7 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.
उद्देश
आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या अन्नाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. नागरिकांना दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणाऱ्या हानीबाबत जागरूक करणे, हा एकमेव उद्देश यामागे आहे.
इतिहास:
सन 2017 मध्ये डिसेंबर महिन्यात झालेल्या अन्न आणि कृषी संघटना परिषदेच्या 40 व्या सत्रात जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंजूर केला होता. संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा करण्याची घोषणा 20 डिसेंबर 2018 रोजी केली होती. यानंतर 7 जून 2019 रोजी पहिल्यांदा जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. WHO आणि अन्न आणि कृषी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानातून हा दिवस साजरा करण्यात येतो.
थीम:
दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिनासाठी खास थीमची निवड केली जाते.
‘Food Standards Saves Lives’अर्थात सकस आहार उत्तम आरोग्याची गुरूकिल्ली, अशी 2023 या वर्षाची थीम आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *