- भारतात तब्बल 27 वर्षानंतर जगभरातील सौंदर्यवतींचा मेळा भरणार आहे. 2023 ची मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.
- भारतात 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन झाले होते. त्यानंतर 27 वर्षांनी ही स्पर्धा पुन्हा भारतात होणार आहे.
- भारतात होणारी ही स्पर्धा एकूण 71 वी स्पर्धा असेल.
- भारताची मिस इंडिया वर्ल्ड सिनी शेट्टी ही ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी:
मिस वर्ल्ड (भारतीय) वर्ष
1) रिटा फारीय 1966
2)ऐश्वर्या राय 1994
3)डायना हेडन 1997
4)युक्ता मुखी 1999
4)प्रियांका चोप्रा 2000
5)मानुषी चिल्लर 2017
मिस वर्ल्ड स्पर्धेविषयी:
- मिस वर्ल्ड (Miss World) ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा आहे.
- लंडन येथे मुख्यालय असलेली ही स्पर्धा 1951 साली युनायटेड किंग्डममध्ये स्थापन करण्यात आली. मिस युनिव्हर्स व मिस ग्रँड इंटरनेशनलसोबत मिस वर्ल्ड ही जगातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा मानली जाते.
- ह्या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धक महिलांना आपापल्या देशामधील सौंदर्यस्पर्धांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. भारतामधील फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा खिताब जिंकणाऱ्या महिलेला मिस वर्ल्डमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडले जाते.
- आजवर 6 भारतीय महिलांनी मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली आहे.
-



