● सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा राष्ट्रीय पुरस्कारांचे 71वे वर्ष होते. नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
प्रमुख विजेते:
● सर्वोत्कृष्ट सिनेमा : ढेल्थ फेल (दिग्दर्शक – विधु विनोद चोप्रा)
● सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा : कटहल (दिग्दर्शक – यशोवर्धन मिश्रा)
● सर्वोत्कृष्ट लोकप्रिय सिनेमा : रॉकी और रानी की प्रेम कहानी (दिग्दर्शक -करण जोहर)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: द केरला स्टोरी (दिग्दर्शक – सुदीप्तो सेन)
● सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मेस्सी (12th फेल)
● सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :राणी मुखर्जी (मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे)
● सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : शिल्पा राव (जवान)
मराठी विजेते
● सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा : श्यामची आई सिनमा (दिग्दर्शक – सुजय डहाके)
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण : आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)
● सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट : नाळ 2 (दिग्दर्शक -सुधाकर रेड्डी यक्कंटी)
● सर्वोत्कृष्ट बाल कलाकार : त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप (नाळ 2)
● सर्वोत्कृष्ट बाल कलाकार : कबीर खंदारे (जिप्सी)
● राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकार ने दिलेले पुरस्कार असून. हे पुरस्कार देण्यास १९५४ सालापासून प्रारंभ झाला. सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.