विकसित भारत’ आणि ‘भारत – लोकतंत्र की मातृका’ या संकल्पनांसह 26 जानेवारी 2024 रोजी कर्तव्य पथ येथे होणारे 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे संचलन महिला-केंद्रित असेल. महिला संचलन करणार्या तुकड्या या संचलनाचा प्रमुख भाग असतील , ज्यात राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/संघटना यांचे बहुतांश चित्ररथ देशाची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता आणि प्रगतीची झलक प्रदर्शित करतील. प्रथमच 100 महिला कलाकारांद्वारे भारतीय वाद्यांसह संचलनाला सुरुवात होईल.
अधिक माहिती
● महिला कलाकारांद्वारे शंख , नादस्वरम, नगाडा वाजवून या संचलनाची सुरुवात केली जाईल.
● या संचलनात प्रथमच कर्तव्यपथावरून कूच करणारी तिन्ही सेनादलातील सर्व महिलांचे पथक पहायला मिळणार आहे.
● केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल.
● संचलनाला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होईल आणि ते सुमारे 90 मिनिटे चालेल.
प्रमुख पाहुणे
● फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
● फ्रान्समधील 95 सदस्यांचे मार्चिंग पथक आणि 33 सदस्यांचे बँड पथकही या संचलनात सहभागी होणार आहेत.
● फ्लाय-पास्टमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानासह, एक मल्टी रोल टँकर ट्रान्सपोर्ट विमान आणि फ्रेंच हवाई दलाची दोन राफेल विमाने सहभागी होणार आहेत.
विशेष पाहुणे
● यावर्षी सुमारे 13,000 विशेष पाहुण्यांना प्रजासत्ताक दिवस संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
● या विशेष पाहुण्यांमध्ये विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट वापर करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
● व्हायब्रंट गावांचे सरपंच;स्वच्छ भारत अभियान, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील महिला कर्मचारी, इस्रोच्या महिला अंतराळ शास्त्रज्ञ, योग शिक्षक (आयुष्मान भारत), आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते आणि पॅरालिम्पिक पदक विजेते यांच्या सोबतीने सर्वोत्कृष्ट बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात संदर्भ आलेल्या व्यक्ती तसेच प्रकल्प वीर गाथा 3.0 चे ‘सुपर-100’ आणि राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेचे विजेते देखील संचलन पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. हे विशेष पाहुणे कर्तव्यपथावर विशेष आसन व्यवस्थेत विराजमान होतील.