Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

8 जून : World Brain Tumor Day (जागतिक ब्रेन ट्युमर दिन)

  • Home
  • Current Affairs
  • 8 जून : World Brain Tumor Day (जागतिक ब्रेन ट्युमर दिन)
  • दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो.
  • ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या ट्यूमरने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो.
  • जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस 2024 ची थीम ‘मेंदूचे आरोग्य आणि प्रतिबंध’ आहे

 ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?

  • प्राथमिक लेवलला मेंदूमध्ये गाठी येतात ज्या मेंदूच्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतात. या गाठी घातक कर्करोग असू शकतात.
  • कर्करोग नसलेल्या ट्यूमरमुळे मेंदूच्या सामान्य ऊतींवर देखील परिणाम होऊ शकतो आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा कर्करोगाच्या पेशी फुफ्फुस, कोलन, मूत्रपिंड आणि स्तन यांसारख्या इतर अवयवांमधून मेटास्टेसिस करतात आणि मेंदूमध्ये पसरतात तेव्हा त्याला दुय्यम ब्रेन ट्यूमर किंवा ब्रेन मेटास्टेसिस म्हणतात.

 ब्रेन ट्यूमर लक्षणे:

  • चक्कर
  • मानसिक स्थितीत बदल
  • व्हिज्युअल समस्या
  • अशक्तपणा
  • डोकेदुखी
  • बेशुद्धी

 ब्रेन ट्यूमरचे प्रकार:

  • शंभराहून अधिक ब्रेन ट्यूमर आहेत. ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूतील गाठी घातक किंवा सौम्य असू शकतात. काही ब्रेन ट्यूमर प्रामुख्याने मेंदूमध्ये किंवा त्याच्या आवरणांमध्ये किंवा कवटीच्या इतर संरचनांमध्ये उद्भवतात, तर काही शरीरात इतरत्र कर्करोगापासून पसरतात, ज्याला आपण मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर असे म्हणतो. न्यूरो-इंटरव्हेंशनल सर्जर, डॉ. विपुल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार ब्रेन ट्यूमरचा आकारावर त्याची लक्षणं बदलू शकतात.

 इतिहास:

  • 2000 साली प्रथमच ‘जागतिक ब्रेन ट्यूमर डे’ साजरा करण्यात आला. याची सुरुवात जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशनने केली होती.
  • ही संस्था ब्रेन ट्यूमरबद्दल लोकांना जागरूक करण्याचे काम करते, जेणेकरून अधिकाधिक लोकांना या आजाराची लक्षणे कळून त्यावर वेळीच उपचार मिळावेत. ब्रेन ट्यूमर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक स्तरावर पाळला जातो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *