- जागतिक डिस्लेक्सिया दिन दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी पाळला जातो.
- डिस्लेक्सिया हा एक शिकण्यात अडचण असलेला सामान्य विकार आहे, हा विकार एखाद्या व्यक्तीच्या योग्यरितीने वाचण्याच्या आणि लिहिण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो.
- ज्यांना डिस्लेक्सिया आहे त्यांच्यासाठी अस्खलितपणे वाचन करणे आणि लिहिणे यासारखी कौशल्ये ही आव्हाने आहेत.
- डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्ती अनेकदा अचूकपणे पटकन वाचू अथवा लिहू शकत नाहीत. डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्तींना वाचन, लेखन, शब्दसंग्रह आणि हात आणि डोळ्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आवश्यक कार्यांमध्ये संघर्ष करावा लागतो.
- या समस्यांबद्दल आणि अशा विकाराचे व्यवस्थापन करण्यासाठी काय केले जाऊ शकते, याबद्दल जागतिक डिस्लेक्सिया दिनी जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
- सर्वसमावेशकतेला चालना , शिक्षणाच्या संधी आणि डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्तींना त्यांच्या शिकण्याच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करणे ही या दिनाची उद्दिष्टे आहेत.
- भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग हा देशातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्व विकास कार्यक्रमांवर लक्ष ठेवणारा नोडल विभाग आहे.
- या विभागाच्यावतीने 8 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक डिस्लेक्सिया दिनाचे औचित्य साधून लोकांमध्ये डिस्लेक्सियाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून, त्याच्याशी संबंधित संस्थांमार्फत देशभरात विविध कार्यक्रम करण्यात आले.


