82 वा ‘गोल्डन ग्लोब‘ पुरस्कार – 2025
- मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्यागोल्डन ग्लोब पुरस्कार लॉस एंजेलिसमधील बिव्हर्ली हिल्टन येथे रंगला.
- चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांचा सन्मान केल्या जाणाऱ्या82 व्या पुरस्कारांमध्ये फ्रेंच दिग्दर्शक जॅक ऑडियार्ड यांच्या ‘एमिलिया पेरेझ’ या चित्रपटाचा दबदबा राहिला.
- दूरचित्रवाणीवरील मालिकेत अमेरिका- जपानचा संयुक्त निर्मिती असलेला’शोगुन’ सर्वोत्कृष्ट ठरला. बिगर इंग्रजी चित्रपटाच्या गटात ‘एमिलिया पेरेझ’ला पुरस्कार मिळाला.
- याशिवाय अनेक विभागांमध्येही एमिलिया पेरेझ’ने बाजी मारली.
- भारताकडून बिगर इंग्रजी चित्रपटाच्या गटात दिग्दर्शिका पायल कापडिया हिचा’ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटाचा तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका म्हणून कापडिया हिला नामांकन मिळाले होते.
- यामुळे यावर्षीच्या’गोल्डन ग्लोब’वर भारतीयांचा ठसा उमटेल, अशी आशा भारतीयांना होती. पण अखेर पदरी निराशाच आली. या दोन्ही गटांतून भारत बाहेर पडला.
- युद्धोत्तर स्थलांतरितांचे अनुभव सांगणाऱ्या’द ब्रुटालिस्ट’ हा ऐतिहासिक चित्रपट उत्कृष्ट ठरला.
प्रमुख पुरस्कार विजेत्यांची यादी
- उत्कृष्ट चित्रपट(बिगर इंग्रजी) : एमिलिया पेरेझ
- उत्कृष्ट चित्रपट(संगीतमय किंवा विनोदी): एमिलिया पेरेझ
- उत्कृष्ट चित्रपट(अॅनिमेटेड) : फ्लो
- उत्कृष्ट चित्रपट(नाट्यमयता) : द ब्रुटालिस्ट
- सिनेमॅटिक आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट: विकेड
- उत्कृष्ट अभिनेत्री(नाट्य) : फर्नाडा टॉरेस (अॅम एम स्टिल हियर)
- उत्कृष्ट अभिनेत्री(दूरचित्रवाणी मालिक, नाटक) हिरोयुका सनदा (शोगुन)
- उत्कृष्ट अभिनेत्री(दूरचित्रवाणी मालिका- संगीत व विनोद) : जीन स्मार्ट (हॅक्स)
- उत्कृष्ट अभिनेता(नाट्य) : एड्रियन ब्रोडी (द ब्रुटालिस्ट)
- उत्कृष्ट दिग्दर्शक(नाट्य): ब्रॅडी कॉर्बेट (द ब्रुटालिस्ट)
गोल्डन ग्लोब:
- गोल्डन ग्लोबहा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे.
- अमेरिकेच्या हॉलिवूड मधील93 सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन ह्या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात.
- चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणारा पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार20 जानेवारी 1944 रोजी लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथील 20 व्या सेंच्युरी फॉक्स स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता.
व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह
- राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- त्या अनुषंगाने14 ते 21 जानेवारी या कालावधीत उद्योग-व्यवसाय क्षेत्र भेट, माजी विद्यार्थी मार्गदर्शन सत्र, करिअर मार्गदर्शन असे उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे(एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी याबाबतच्या सूचना जिल्हा परिषदांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, महापालिकांचे प्रशासन अधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.
- 9 वी ते12 वी चे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनच्या शाळांमध्ये 14 जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
- या वर्षी हा उपक्रम सप्ताहाच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे.
- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा
- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी तेथील सत्तारूढ पक्षाच्या प्रमुखपदाचा आणि पर्यायाने पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
- गेले काही महिने ट्रुडोंना पक्षातूनच प्रखर विरोध होत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या सरकारमधील उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री ख्रिस्तिना फ्रीलँड यांनी राजीनामा दिला. यानंतर ट्रुडो यांचे स्थान अधिक डळमळीत झाले.
राजीनामा का द्यावा लागला?
- गेले काही महिने कॅनडा सरकारच्या अनेक धोरणांवरून ट्रुडो यांच्यावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली होती.
- 2013 मध्ये ट्रुडो लिबरल पक्षाचे अध्यक्ष झाले आणि2015 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने कॅनडात निवडणूक जिंकली.
- यानंतर दहा वर्षे ते कॅनडाचे पंतप्रधान राहिले.
- तीन निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाने जिंकल्या. परंतु महागाई, घरांच्या वाढलेल्या किमती, स्थलांतरितांचा प्रश्न या मुद्द्यांवर त्यांच्या पक्षाच्या विरोधात जनमत तीव्र झाले होते.
- पक्षांतर्गतच त्यांच्या धोरणांवर टीका सुरू झाली.
- विरोधी कॉन्झर्व्हेटिव पक्षाने या काळात जनमत चाचण्यांमध्ये मोठी मुसंडी मारली. ट्रुडो हेच पंतप्रधान राहिले, तर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याची दखल घेऊन ट्रुडो यांनी पंतप्रधानपद आणि पक्षप्रमुखपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
नॅशनल बँकेचे कॉसमॉस मध्ये विलीनीकरण
- बंगळूर येथील दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व13 शाखांचे रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने कॉसमॉस बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे.
- या सर्व शाखा6 जानेवारीपासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत झाल्या असून, कॉसमॉस बँकेच्या सुविधा आता या बँकेच्या ग्राहकांना मिळतील.
- नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या13 शाखा असून, 12 शाखा बंगळूरमध्ये आणि एक शाखा म्हैसूर येथे आहे.
- नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेचा व्यवसाय डिसेंबर2024 अखेर 1 हजार 326 कोटी रुपये आहे.
- या विलीनीकरणामुळे ठेवीदारांच्या सुमारे792 कोटींच्या ठेवींना संरक्षण मिळाले आहे.
- बंगळूरस्थित या बँकेच्या विलीनीकरणामुळे कॉसमॉस बँकेचा विस्तार कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.
- 7 राज्यांमध्ये आता बँकेच्या183 शाखा झाल्या आहेत
‘मैया सन्मान‘चा निधी वितरित
- झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी5 जानेवारी रोजी मैया सन्मान योजनेतंर्गत61 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात 1,415 कोटींचा निधी हस्तांतरित केला.
- सोरेन सरकारने लाभार्थीची प्रतिमहिना रक्कम1 हजारावरून अडीच हजार करण्याचा निर्णय घेतला आहे.
- मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही झारखंड राज्यात सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांना2500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
भारतातही एचएमपीव्हीचा विषाणू आढळला
- चीनमध्ये कोरोनाप्रमाणेच प्रसार होणाऱ्या एचएमपीव्ही(ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) विषाणूमुळे जगावर पुन्हा एकदा काळजीचे सावट निर्माण झालेले असताना भारतात या विषाणूने प्रवेश केला आहे.
- देशात या विषाणूचे पाच रुग्ण आढळले असून यात कर्नाटक व तमिळनाडूतील प्रत्येकी दोन, तर गुजरातेतील एका रुग्णाचा समावेश आहे.
- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने या रुग्णांची पुष्टी केली असून नियमित तपासणीदरम्यान या विषाणूंचे निदान झाले.
- कर्नाटकात ब्रोंकोन्यूमोनिया असलेल्या आठ महिन्यांच्या अर्भकाची या विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली.
कसा असतो एचएमपीव्ही?
- या विषाणूमुळे श्वसन संस्थेमध्ये संसर्ग होतो. सर्व वयोगटांतील लोकांना त्याचा संसर्ग होतो.
- याचा शोध प्रथम2001 मध्ये लागला.
- पॅरामायझोव्हिरायडी या प्रवर्गातील हा विषाणू असून, तो रेस्पिरेटरी सिन्सिटिकल व्हायरसशी संबंधित असतो.
- खोकताना किंवा शिंकताना उडालेले तुषार, संक्रमित पृष्णभागाला झालेला स्पर्श किंवा बाधित रुग्णाचा थेट संपर्क या माध्यमातून या विषाणूचा फैलाव होतो.
प्रमुख लक्षणे:
- प्रत्येकाचे वय, त्याचे एकूण आरोग्यमान आणि रोगप्रतिकार क्षमता यानुसार व्यक्तिनिहाय लक्षणे भिन्न असू शकतात.
- सर्दी, घशात संसर्ग, खोकला, ताप अशी लक्षणे समावेश सौम्य संसर्गात दिसतात.
- तीव्र संसर्गात दीर्घकाळ खोकला, श्वासाची घरघर, थकवा अशी लक्षणे दिसतात.
- गंभीर संसर्गात, त्यातही ज्यांना श्वसनाचे जुनाट आजार आहेत, अशांमध्ये ब्राँकायटिस, ब्राँकोलायटिस किंवा न्यूमोनिया अशी लक्षणे दिसतात.
निदान कसे होते?
- एचएमपीव्ही आरएसव्ही किंवा इन्फ्लूएंझा यासारख्या विषाणूंची नक्कल करीत असल्याने त्याचे नेमके निदान करणे कठीण असते.
- आरटीपीसीआर चाचणी(रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्शन पॉलिमराइज चेन रिअॅक्शन) हा निदानाचा सर्वोत्तम मार्ग आहे.
उपाय:
- सध्या तरी एचएमपीव्हीवर कोणतीही वेगळी लस उपलब्ध नाही.
- सध्या तरी लक्षणात्मक उपचार केले जातात. रुग्णाच्या संसर्गाच्या तीव्रतेवर ते अवलंबून असतात.
- न्यूमोनिया, ब्राँकोलायटिस झालेल्यांना बाहेरून ऑक्सिजन पुरवठा करावा लागू शकतो आणि त्यांना रुग्णालयात दाखलही करावे लागू शकते.
प्रभाव किती काळ राहतो?
- काही दिवसांपासून ते आठवडाभरापर्यंत संक्रमणाचा बहर राहतो.
- संसर्ग तीव्र असल्यास रुग्णांचा बरे होण्यासाठीचा कालावधी यापेक्षा अधिक असू शकतो.