गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.
अधिक माहिती
● एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षांत तीन टप्प्यात राबविण्यात येईल.
● केंद्र सरकारने येणाऱ्या जुलै 2024 पासून ही लसीकरण मोहीम सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
● साडेसहा ते सात कोटी लस मात्रांचा साठा सरकारकडे आल्यानंतर या मोहिमेला सुरुवात होईल.
● गर्भाशय मुखाच्या कर्करोगाव्यतिरिक्त ही लस एचपीव्ही च्या प्रादुर्भावामुळे होणारा कर्करोग योनी आणि घशाजवळील भागाच्या कर्करोगालाही प्रतिबंध करते.
● सलग तीन वर्ष राबविण्यात येणाऱ्या या लसीकरण मोहिमेत प्रत्येक वर्षी 9 ते 14 वर्ष वयोगटातील एक तृतीयांश मुलींचे लसीकरण करण्यात येईल.
● तीन वर्षांत देशभरात 9 ते 14 वर्ष वयोगटातील सुमारे 8 कोटी मुलींचे लसीकरण करण्यात येईल.
● पहिल्या वर्षी किमान 2 कोटी 60 लाख मुलींना लस देण्यात येणार आहे.
● लसीकरण मोहीम शाळा, सध्याचे लसीकरण केंद्रामध्ये राबविण्यात येईल.
● गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळणारा भारत हा पाचवा देश .
● भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख रुग्णांची नोंद.
● सुमारे 75 हजार महिलांचा मृत्यू
● एचपीव्ही उपप्रकाराच्या सततच्या संसर्गामुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या धोका अधिक.
● पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देशी बनावटीची सर्व्हव्हॅक ही एचपीव्ही लस तयार केली असून ती बाजारात उपलब्ध आहे.
● सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक साठा तयार करण्याच्या दृष्टीने सिरम प्रयत्नशील आहे.
● ‘सिरम’ ची प्रतिवर्षी वीस ते तीस लाख मात्र तयार करण्याची क्षमता आहे. तथापि ती वाढवण्याचा संस्थेचा मानस आहे.