● भारताच्या ऑलिम्पिक विजेत्या नीरज चोप्राने 90 मीटर भालाफेक करण्याचे स्वप्न डायमंड लीगमध्ये साकार केले.
● दोहा येथे झालेल्या स्पर्धेत नीरजने 90.23 मीटरचे अंतर गाठले. मात्र, तो विजयापासून वंचित राहिला.
● जर्मनीच्या ज्युलियन वेब्बरने 91.06 मीटर अंतरासह अव्वल स्थान मिळविले.
● नीरजला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
● ऑलिम्पिकमधील यशानंतर नीरजने 90मीटर अंतराचे ध्येय बाळगले होते.
● विश्वविक्रमवीर यान झेलेइनी यांना प्रशिक्षकपदी नियुक्त केल्यावर दुसऱ्याच स्पर्धेत नीरजने आपले ध्येय गाठले.
● नीरजची नीरजची यापूर्वी 89.94 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी होती.
● तीन वर्षांपूर्वी डायमंड लीगच्याच स्टॉकहोम येथील टप्प्यात त्याने ही कामगिरी केली होती.
● भालाफेक प्रकारात 90 मीटरचे लक्ष्य गाठणारा नीरज भारताचा पहिला खेळाडू ठरला असला, तरी तो आशियातील तिसरा आणि जगातील 25 वा भालाफेकपटू आहे.
● पॅरिस ऑलिम्पिक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम (92.97 मीटर), तैपेइचा चाओ त्सुन चेंग (91.36 सेकंद) हे 90 मीटरचे अंतर पार करणारे अन्य दोन आशियाई भालाफेकपटू आहेत.
● दोहा डायमंड लीगमध्ये तिसऱ्या प्रयत्नात नीरजने हे लक्ष्य गाठले.
● त्यापूर्वी पहिल्या प्रयत्नात त्याने 88.44 मीटर भालाफेक केली होती.
● अखेरच्या प्रयत्नात नीरज 88.20 मीटरच गाठू शकला.