97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान संमेलन होत आहे.
● या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमळनेरमध्ये ग्रंथ दिंडी काढण्यात आली.
● हे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सानेगुरुजी नगरी येथे होत आहे.
● 1952 मध्ये अमळनेरमध्ये कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झाले होते. त्यानंतर आता अमळनेरमध्ये हे संमेलन होत आहे.
● या साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झाले.
● संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. रवींद्र शोभणे हे आहेत.