Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन All India Marathi Literature Conference

 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 

  • तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज (21 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली असून देश व विदेशातील साहित्यरसिकही मोठ्या संख्येने पोहोचत आहेत.
  • 21 फेब्रुवारी रोजी दुपारी30 वाजता विज्ञान भवनात संमेलनाचे पहिले उद्घाटन होणार आहे.
  • या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे मोदी हे नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान असतील.
  • अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर राहतील. या वेळी मंचावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील.
  • मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन असल्याने साहित्यरसिकांमध्ये या संमेलनाचे विशेष आकर्षण आहे.
  • साहित्य संमेलनाला सुमारे तीन हजार लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे, त्यात जवळपास 1500 कवी, लेखक आणि प्रकाशन जगतातील व्यक्ती आहेत.
  • सरहद संस्थेकडून आयोजित या संमेलनात सुमारे 100 पुस्तकांचे प्रकाशन देखील होणार आहे.

दुसरे द्घाटन तालकटोरा मैदानात

  • संमेलनाचे दुसरे उद्घाटन प्रत्यक्ष संमेलनाच्या ठिकाणी अर्थात तालकटोरा मैदानात संध्याकाळी30 वाजता होणार आहे.
  • माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या या उद्घाटनीय सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार उपस्थित राहणार आहेत.

 

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *