Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

99 वे साहित्य संमेलन सातारा येथे होणार 99 वे साहित्य संमेलन सातारा येथे होणार 99th Literary Conference to be held in Satara 99th Literary Conference to be held in Satara

  • Home
  • June 2025
  • 99 वे साहित्य संमेलन सातारा येथे होणार 99 वे साहित्य संमेलन सातारा येथे होणार 99th Literary Conference to be held in Satara 99th Literary Conference to be held in Satara
99th Literary Conference to be held in Satara 99th Literary Conference to be held in Satara

● आगामी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळाला आहे.
● अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.
● तब्बल 32 वर्षांनंतर सातारा येथे साहित्य संमेलन होणार असून, साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये साताऱ्याला होणारे हे चौथे संमेलन असेल.
● नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा, की 1993 मधील 66 वे संमेलन इथेच झाले होते.
● हे स्टेडियम 14 एकरांत असून, तेथे मुख्य मंडप, दोन इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

साताऱ्यातील चौथे संमेलन

● लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी 1878 मध्ये ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर तिसरे संमेलन 1905 मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते.
● 1962 मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे, तर 1993 मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात झाले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *