Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

सामाजिक कार्यकर्त्या शोभना रानडेंचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या शोभना रानडेंचे निधन
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व गांधी नॅशनल मेमोरियल  सोसायटीच्या विश्वस्त सचिव  शोभना रानडे यांचे  वयाच्या 99 वर्षी निधन झाले.
  • सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारने रानडे यांना 2011 मध्ये पद्मभूषण किताबाने सन्मानित केले होते.

अल्पपरीचय:

  • जन्म : 26 ऑक्टोबर 1924 रोजी पुणे येथे.
  • वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर रानडे यांनी आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारले.हा क्षण त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.
  • आसाममधील उत्तर लखीमपूर येथे 1955 मध्ये त्या विनोबा भावे यांच्यासमवेत पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.
  • यावेळी मैत्री आश्रम आणि शिशु निकेतनमधील पहिले बाल कल्याण केंद्र स्थापन करण्यात त्यांनी मदत केली.
  • विनोबांच्या आग्रहाने शोभनाताई मैत्री आश्रमाच्या विश्वस्त झाल्या.
  • शोभनाताईंनी आसामी भाषेतील दोन  कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद केला.
  • महिलांना चरखा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी रानडे यांनी आदिम जाती सेवासंघ ही संस्था सुरू केली.
  • 15  ऑगस्ट 1974 रोजी त्यांनी निराधार मुलांसाठी पहिले बाल सदन सुरू केले.
  • महिलांना गांधी विचारांवर आधारित समाजकार्य कसे करावे याचे प्रशिक्षण सुरू करून त्यांनी 300 होऊन अधिक सामाजिक कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले.
  • भारतातील पहिले मुलींसाठीचे कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय सुरू केले.
  • जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, प्राईड ऑफ पुणे पुरस्कार यांसह बालकल्याण कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

 98 वे साहित्य संमेलन दिल्ली येथे भरणार

  • आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन  राजधानी दिल्लीत होणार आहे.
  • अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत  संमेलन दिल्लीत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी सांगितले.
  • 1954 नंतर, म्हणजेच 70 वर्षांनी दिल्लीत साहित्य संमेलन भरणार आहे.
  • 98 व्या साहित्य संमेलनासाठी यावर्षी सात संस्थांची निमंत्रणे आली होती.
  • दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड 5 आणि 6 ऑक्टोबरला पुणे येथे होईल.
  • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेत 1954 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते; मात्र त्या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात नव्हते.
  • 1964-65 मध्ये महामंडळाची स्थापना झाल्यावर पहिलेच आणि एकंदरीत 46वे साहित्य संमेलन हैदराबादमध्ये प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते.

 पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जोकोविचला सुवर्णपदक

  • सर्वाधिक 24 ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या  नोवाक जोकोविच याचे ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न  पॅरिसमध्ये पूर्ण झाले.
  • सर्बीयाच्या जोकोविच याने स्पेनच्या कार्लोस अल्काराझ याच्यावर 7-6, 7-6 असा सरळ दोन सेटमध्ये विजय साकारला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.
  • पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या अल्काराझ याने रौप्यपदक पटकावले.

बीजिंगमध्ये कांस्य

  • नोवाक जोकोविच याने 2008 मधील बीजिंग ऑलिंपिकमध्ये एकेरी विभागात कांस्य पदक पटकावले होते.
  • त्यानंतर 2012 लंडन ऑलिम्पिक व 2021 टोकियो ऑलिम्पिक या दोन्हीमध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
  • 2021मधील ऑलिंपिकमध्ये तो मिश्र विभागातही सहभागी झाला होता. त्यामध्ये तो निना स्टोजानोविच हिच्यासह कोर्टवर उतरला. या जोडीने चौथे स्थान पटकावले होते.

इटलीच्या मुसेटी याला कांस्य

  • पुरुष एकेरीमधील तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत इटलीच्या लोरेंझो मुसेटी याने कॅनडाच्या फेलिक्स एलीयासिम याच्यावर तीन सेटमध्ये मात केली आणि कांस्यपदकाला गवसणी घातली.
  • मुसेटी याने 6-4, 1-6, 6-3असा विजय साकारला.

अल्फ्रेड ठरली सर्वात वेगवान महिला

  • ऑलम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील मध्यवर्ती आकर्षण असलेल्या महिलांच्या 100 मीटर शर्यतीत सेंट लुसियाच्या ज्युलियन आल्फ्रेडने 72सेकंदात सुवर्णपदक मिळवताना अॅथलेटिक्स विश्वाला चकित केले.
  • अमेरिकेची शाकरी रिचर्ड्सन(10.87) आणि अमेरिकेच्याच मेलिसा जेफरसन(10.92) या धावपटू रौप्य आणि कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या.

अल्फ्रेडची प्रमुख कामगिरी

  • 2017 – 100 मीटर – कॉमनवेल्थ युथ गेम्स – सुवर्णपदक
  • 2018 – 100 मीटर – युथ ऑलिंपिक – रौप्यपदक
  • 2022 – 100 मीटर-  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रौप्यपदक
  • 2023 – 100 मीटर-  जागतिक स्पर्धा – पाचवे स्थान
  • 2023 – 0- 200 मीटर – जागतिक स्पर्धा – चौथे स्थान

राष्ट्रीय तटीय अभियान योजना

  • राष्ट्रीय तटीय व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत खालील घटकांसह राष्ट्रीय तटीय अभियान योजना (एनसीएम) राबवण्यात येत आहे:
  • कांदळवने आणि प्रवाळ खडकांच्या संवर्धनासाठी व्यवस्थापन कृती योजना
  • सागरी तसेच किनारपट्टीवरील  परिसंस्थेचे संशोधन आणि विकास
  • तटीय /किनारी पर्यावरण आणि सौंदर्यीकरण व्यवस्थापन सेवेअंतर्गत समुद्र किनाऱ्यांचा शाश्वत विकास
  • तटीय स्वच्छता अभियानासह सागरी तसेच किनारपट्टीवरील  परिसंस्थेच्या संवर्धनावर आधारित तटीय राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांचे क्षमता निर्मिती/ प्रसारविषयक कार्यक्रम
  • एनसीएमसाठी अंमलबजावणी संस्था म्हणून किनारपट्टी असलेल्या राज्यांची सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश  प्रशासने यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांच्यातर्फे मंत्रालयाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांच्या आढाव्याच्या आधारावर या राज्यांना/ केंद्रशासित प्रदेशांना निधी देण्यात येईल.
  • आंध्रप्रदेशातील पायाभूत सुविधा विकास, प्रदूषण नियंत्रण, सुरक्षाविषयक देखरेख व्यवस्था तसेच किनारपट्टी स्वच्छतेसाठी ईएपी (बाह्य मदत कार्यक्रम) तसेच बिगर-ईएपी घटकाअंतर्गत वर्ष 2018-19 पासून 2023-24 पर्यंत 94 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
  • तसेच केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे एकात्मिक किनारपट्टी प्रदेश व्यवस्थापन प्रकल्प (आयसीझेडएमपी) राबवण्यात येत असून या प्रकल्पाने आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यासह संपूर्ण भारताच्या किनारपट्टी भागांसाठी  इतर अनेक बाबींसह धोका रेषेचे मॅपिंग, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग, गाळविषयक कक्ष यांच्या उभारणीत योगदान दिले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *