‘छात्रमानस‘ योजना
- गेल्या काही वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
- अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या ताणामुळे जीवन संपवत असल्याचेही समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत आता वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व शासकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘छात्रमानस योजना‘राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.
- मागील वर्षी केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार राज्यात 5 वर्षांत 14 वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.
- यामुळे या विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा गंभीर प्रश्न समोर आला आहे यावर तोडगा म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने ‘छात्रमानस’ योजना राबविण्याचे निर्णय घेतला आहे .याअंतर्गत विद्यार्थ्यांची समुपदेशन केले जाणार आहे .
- विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य सबलीकरणासाठी छात्र मानस योजना राबविण्यात येणार असून प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात छात्र मानस कक्ष सुरू करण्यात येणार आहे .
- प्रत्येक महाविद्यालयामध्ये कंत्राटी तत्वावर दोन मानसोपचार समुपदेशक नियुक्त करण्यात येणार आहेत.
- याला राज्य सरकारने मंजुरी देखील दिली आहे.
- मूल्यमापन करण्यासाठी समिती छात्रमानस योजनेअंतर्गत उपाययोजना करण्यासाठी तसेच योजनेचा नियमितपणे आढावा व मूल्यमापन करण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
- या समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक(मानसशास्त्र), सदस्यपदी सहयोगी प्राध्यापक (मानसशास्त्र)आणि सदस्य सचिवपदी समाजसेवा अधीक्षक असतील.
कॅबिनेट सचिवपदी टी. व्ही. सोमनाथन
- ज्येष्ठ आयएएस अधिकारी टी. व्ही. सोमनाथन यांची कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
- राजीव गौबा यांच्यानंतर ते कॅबिनेट सचिवपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
- सन 1987च्या बॅचचे तमिळनाडू केडरचे अधिकारी असलेले सोमनाथन सध्या केंद्रीय वित्त सचिव आणि व्यय सचिव म्हणून काम पाहत आहेत.
- कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने टी. व्ही. सोमनाथन यांची कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती मंजूर केली आहे.
- त्यांना 30 ऑगस्ट 2024 पासून दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.
- कॅबिनेट सचिवपदाची सूत्रे स्वीकारेपर्यंत सोमनाथन यांची कॅबिनेट सचिवालयात विशेषाधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे.
- कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी पाच वर्षांपूर्वी, 30 ऑगस्ट 2019 रोजी या पदाची सूत्रे स्वीकारली होती.
अभिनेते विजय कदम यांचे निधन
- रंगभूमी ते चित्रपट,मालिका, जाहिराती अशा विविध माध्यमांतून लोकप्रिय ठरलेले हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले.
- हसतमुख स्वभाव असलेले विजय कदम गेले वर्ष-दीड वर्ष कर्करोगाशी झुंजत होते.
- ऐंशी ते नव्वदच्या दशकांत मराठीतील जे कलाकार रंगभूमी, मालिका, चित्रपट आणि त्यावेळी लोकांच्या चर्चेचा विषय असलेल्या जाहिराती या सगळ्या माध्यमांतून लोकप्रिय ठरले होते, त्यांच्यापैकी विजय कदम हे अग्रणी नाव.
- विजय कदम यांनी अभिनयाच्या कारकीर्दीला रंगभूमीपासूनच सुरुवात केली.
- कदम यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘खुमखुमी’ या नाटकांना रसिकांनी भरभरून दाद दिली.या नाटकाचे प्रयोग त्यांनी देशातच नाही,तर परदेशातही केले.
- विनोदाचे अचूक टायमिंग हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य होते.
- ‘रथचक्र’, ‘टूरटूर’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ अशा कित्येक नाटकांत त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या.
- विजय कदम यांनी 1980च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
- ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बालनाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.
- ‘विच्छा माझी पुरी करा’या लोकनाट्याने राजमान्यता दिली.
- ‘खुमखुमी’ हा अत्यंत लोकप्रिय एकपात्री प्रयोगही यशस्वी झाला.
सुसान वोज्स्की यांचे निधन
- ‘यू-ट्यूब’च्या माजी ‘सीईओ’ आणि ‘गुगल’ च्या प्रदीर्घ काळ कार्यकारी अधिकारी राहिलेल्या सुसान वोज्स्की यांचे कर्करोगामुळे वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले.
- ‘गुगल’च्या निर्मितीत वोज्स्की यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
- मनोरंजन, संस्कृती आणि राजकारणाला नव्याने आकार देणारी ‘यू-ट्यूब’ ही व्हिडिओ साइट नऊ वर्षे चालवल्यानंतर त्यांनी 2023 मध्ये ‘यू-ट्यूब’च्या सीईओपदाचा राजीनामा दिला होता.
टोलाला मॅरेथॉनचे सुवर्ण
- इथियोपियाचा धावपटू तामिरत टोलाने पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष मॅरेथॉनचे सुवर्णपदक मिळवले.
- टोलाने 2 तास, 6 मिनिटे व 26 सेकंद वेळेची नोंद करीत ऑलिम्पिक विक्रमाची नोंद केली.
- तर, बेल्जियमच्या बशीर अब्दीने 21 सेकंद मागे राहत दुसरे स्थान मिळवरत रौप्यपदक तर, केनियाच्या बेनसन किपूतोने कांस्यपदक मिळवले.
स्पेनला सुवर्ण
- स्पेनने पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
- स्पेनने फ्रान्सचा अतिरिक्त वेळेत ५-३ असा पराभव केला.
- स्पेनने 36 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णयश मिळवले.
- यापूर्वी, 1992 बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये स्पेनने पोलंडला हरवून सुवर्ण पटकावले होते.
- मागील ऑलिम्पिकमध्ये स्पेनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ब्राझीलकडून स्पेनला हार पत्करावी लागली होती.
- फ्रान्स ला रौप्य तर मारोक्कोला कांस्य पदक मिळाले.