Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

एनआयआरएफ रँकिंगमध्ये सलग सहाव्या वर्षी आयआयटी मद्रास अव्वलस्थानी

एनआयआरएफ रँकिंगमध्ये सलग सहाव्या वर्षी आयआयटी मद्रास अव्वलस्थानी

मित्र शक्तीलष्करी सराव – 2024

  • भारत आणि श्रीलंकेचा संयुक्त लष्करी सराव ‘मित्र शक्ती’ची 10 वी आवृत्ती श्रीलंकेतील मदुरु ओया येथील आर्मी ट्रेनिंग स्कूल येथे सुरू झाली.
  • हा सराव 12 ते 25 ऑगस्ट 2024 या कालावधीत होत आहे.
  • 106 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व राजपुताना रायफल्सच्या बटालियन करत असून या दलात इतर सशस्त्र  दल आणि सेवेतील जवानांचा देखील समावेश आहे.
  • श्रीलंकेच्या तुकडीचे प्रतिनिधित्व श्रीलंकन सैन्याच्या गजाबा रेजिमेंटचे जवान करत आहेत.
  • संयुक्त सराव ‘मित्र शक्ती’ हा भारत आणि श्रीलंकेत आयोजित केला जाणारा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
  • हा युद्ध सराव भारत आणि श्रीलंकेत आलटून पालटून आयोजित केला जातो.
  • या सरावाची मागील आवृत्ती नोव्हेंबर 2023 मध्ये पुण्यात आयोजित करण्यात आली होती.

उद्देश:

  • या संयुक्त सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्यातील अध्याय VII अंतर्गत उप-पारंपरिक परिस्थितीत बंडखोरीविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा आहे.  हा सराव अर्ध-शहरी वातावरणातील मोहीमेवर लक्ष केंद्रित करेल.
  • सरावाच्या दरम्यान करायच्या सामरिक कवायतींमध्ये दहशतवादी कारवाईला प्रतिसाद, संयुक्त कमांड पोस्टची स्थापना, गुप्तचर आणि निगराणी केंद्राची स्थापना, हेलिपॅड किंवा लँडिंग साइट सुरक्षित करणे, लहान तुकड्या तैनात करणे आणि त्या माघारी बोलावणे, स्पेशल हेलिबोर्न ऑपरेशन्स आणि कॉर्डन यासह ड्रोन आणि काउंटर ड्रोन प्रणालीच्या अंमलबजावणीव्यतिरिक्त शोध मोहीम यांचा समावेश आहे.
  • युद्ध सराव ‘मित्र शक्ती’ दोन्ही देशांना रणनीती, तंत्रे आणि संयुक्त मोहीमा चालवण्याच्या प्रक्रियेतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यास सक्षम करेल.
  • हा सराव दोन्ही देशांच्या सैन्यांमधील आंतर-कार्यक्षमता, सौहार्द आणि परस्पर सौहार्द विकसित करण्यास मदत करेल.
  • या संयुक्त सरावामुळे दोन्ही मित्र राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होऊन संरक्षण सहकार्य देखील वृद्धिंगत होईल.
  • मित्र शक्ती सरावाला 2012 या वर्षी सुरवात झाली असून 2024 ची या सरावाची 10 वी आवृत्ती आहे.
  • या सरावाची पहिली आवृत्ती पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

एनआयआरएफ रँकिंगमध्ये सलग सहाव्या वर्षी आयआयटी मद्रास अव्वलस्थानी

  • ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रैंकिंग फ्रेमवर्क’ची (एनआयआरएफ) सन 2024ची क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने  जाहीर केली.
  • या क्रमवारीत आयआयटी, मद्रासने सलग सहाव्या वर्षी देशात अव्वल स्थान पटकावले आहे, तर आयआयटी, मुंबईला तिसरे स्थान मिळाले आहे.
  • ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ (आयआयएससी), बेंगळुरूला सलग नवव्या वर्षी सर्वोत्तम विद्यापीठाचे मानांकन मिळाले आहे.
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या क्रमवारीची नववी आवृत्ती जाहीर केली.
  • ‘आयआयएससी, बेंगळुरू’ ने एकत्रित श्रेणीत देशात दुसरे स्थान पटकावले असून, त्या पाठोपाठ आयआयटी, मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे.
  • पहिल्या 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यादीत 9 आयआयटी असून आयआयटी मद्रास या श्रेणीत सलग नवव्या वर्षी अव्वल स्थानावर आहे .
  • आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई यांनीही या श्रेणीत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान कायम ठेवले आहे.
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरुचिरापल्ली  या यादीतील एकमेव नॉन आयआयटी संस्था आहे.
  • व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद ने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
  • त्या पाठोपात आयआयएम बंगळुरू आणि आयआयएम कोळीकोड यांचा क्रमांक लागला आहे.
  • राज्य सरकारी विद्यापीठांमध्ये चेन्नई येथील अण्णा विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले आहे.
  • त्यानंतर कोलकत्ता येथील जादवपूर विद्यापीठाने दुसरे तर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरे स्थान मिळवले आहे.
  • कौशल्य विद्यापीठांमध्ये पुण्यातील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने अव्वल स्थान मिळवले आहे.

 मानांकनाचे पाच निकष:

1) अध्यापन, अध्ययन आणि स्त्रोत

2) संशोधन आणि व्यवसायिक सराव

3) पदवीचा निकाल

4) पोहोच आणि समावेशकता

5) धारणा

अभिनेता वरुण धवन वॉकरुचा ब्रँड अॅम्बेसिडर

  • देशातील अग्रगण्य फूटवेअर ब्रँड वॉकरुने कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी अभिनेता वरुण धवनची नियुक्ती केली आहे.
  • ‘वॉक. वॉक. वॉक. वॉक विथ वॉकरु’ ही कंपनीची टॅगलाइन असून, कंपनीने वॉकरू प्लस सुपर क्लॉग्ज कलेक्शन सादर केले आहे.
  • कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक : व्ही. नौशाद

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *