जागतिक छायाचित्रण दिन
- 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्रण दिन म्हणून साजरा केला जातो.
- छायाचित्रणाच्या क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणाऱ्या छायाचित्रकारांचे कौतुक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- जागतिक छायाचित्रण दिन 2024 थीम:“एक संपूर्ण दिवस”
इतिहास:
- वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये 1837 मध्ये झाली.
- फ्रान्सचे जोसेफ निसेफोर आणि लुई डग्युरे यांनी त्यावर्षी 19 ऑगस्ट रोजी याची सुरुवात केली. त्यानंतर तेथील सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो.
- 2010 या वर्षापासून हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो.
छायाचित्रण दिनाचा उद्देश :
- छायाचित्रण दिन साजरा करण्यामागचा उद्देश छायाचित्रण कलेला प्रोत्साहन देणे हा आहे.
- त्यानिमित्त या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि छायाचित्रण प्रदर्शनही आयोजित केलं जातं, ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी क्लिक केलेले दुर्मीळ फोटो या कार्यक्रमात प्रदर्शित केले जातात.
तटरक्षक दल प्रमुख राकेश पाल यांचे निधन
- भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे चेन्नई येथे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले.
- तटरक्षक दलाचे 25 वे प्रमुख म्हणून त्यांनी जुलै 2023 रोजी सूत्रे स्वीकारली होती.
- तटरक्षक दलाची क्षमता व सामर्थ्य वाढण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
- संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाच्या झालेल्या एका कार्यक्रमाला राकेश पाल उपस्थित राहणार होते. मात्र, छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.
- राकेश पाल मुळचे उत्तर प्रदेशचे असून जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले होते.
- 35 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
- गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
- त्यापूर्वी त्यांनी नवी दिल्ली येथे उपमहासंचालक (नीती आणि योजना), आणि अतिरिक्त महासंचालक कोस्ट गार्ड म्हणून काम केलं होतं.
- राकेश पाल यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल 2013 मध्ये तटरक्षक पदक आणि
- 2018 मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदकाने गौरवण्यात आलं होतं
- राकेश पाल हे भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत.
- कोची येथे इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, येथे त्यांनी तोफखाना आणि शस्त्रे प्रणालींमध्ये विशेष व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे.
- युनायटेड किंगडममधून त्यांनी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन अभ्यासक्रम केला आहे.
- भारतीय तटरक्षक दलाचे पहिले गनर म्हणून ते ओळखले जातात.
पाल यांची महत्वाच्या पदावर नियुक्ती:
- 34 वर्षांच्या आपल्या दिमाखदार कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांची नियुक्ती झाली आहे.
- कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम), गांधीनगर, उपमहासंचालक (नीती आणि योजना), आणि
- नवी दिल्लीत भारतीय तट रक्षक दलाच्या मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक ही त्यातील प्रमुख पदे आहेत.
- नवी दिल्ली येथे तटरक्षक दलाच्या मुख्यालयात संचालक (पायाभूत सुविधा आणि कामे) आणि प्रधान संचालक (प्रशासन) म्हणून त्यांनी उत्तमपणे कामगिरी बजावली आहे.
अनेक मोहिमांत महत्वपूर्ण भूमिका निभावली:
- पाल यांनी सागरी मोहिमांचा मोठा अनुभव आहे
- सर्व समर्थ, आयसीजीएस विजीत, आयसीजीएस सुचेता कृपलानी, आयसीजीएस अहिल्याबाई, आणि आयसीजीएस सी -03 या तटरक्षक दलाच्या सर्व प्रकारच्या जहाजांवर अधिकारी म्हणून काम केले आहे.
- गुजरातमधील फॉरवर्ड एरियाच्या ओखा आणि वाडीनार या दोन तटरक्षक तळांवरही त्यांनी अधिकारी म्हणून कामाचा अनुभव घेतला आहे.
- राकेश पाल यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर बढती मिळाली आणि त्यांची नवी दिल्ली येथे तटरक्षक दल मुख्यालयात नियुक्ती झाली.
- फेब्रुवारी 2023 मध्ये तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार त्याच्याकडे सोपवण्यात आला. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा राबवल्या.
- त्यात अंमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करणे, तीव्र चक्रीवादळाच्या वेळी नाविकांची सुटका करणे, परकीय तटरक्षक दलांसोबत संयुक्त सराव, तस्करी विरोधी कारवाया, चक्रीवादळ/नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवतावादी मदत आणि किनारी सुरक्षा सराव यांचा समावेश आहे.
भारतीय तटरक्षक दल:
- इंडियन कोस्ट गार्ड ( ICG ) ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे ज्याचे क्षेत्रीय जलक्षेत्र आणि विशेष आर्थिक क्षेत्र यांचा समावेश आहे .
- हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे .
- स्थापनेची घोषणा : 1 फेब्रुवारी 1977
- स्थापना : 18 ऑगस्ट 1978
- बोधवाक्य : वयम् रक्षामः (आम्ही रक्षण करतो)
- मुख्यालय : नवी दिल्ली
- तटरक्षक दल भारतीय नौदल , मत्स्यव्यवसाय विभाग , महसूल विभाग (सीमाशुल्क), आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस सेवा यांच्या निकट सहकार्याने कार्य करते .
- 1 फेब्रुवारी रोजी तटरक्षक दिन साजरा केला जातो.
किलीमांजारो शिखरावर यशस्वी चढाई
- पुण्यातील गिरिप्रेमी अॅडव्हेंचर -फाउंडेशनच्या गिर्यारोहकांनी 15 ऑगस्ट – रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आफ्रिका खंडातील किलीमांजारो या शिखरावर तिरंगा ध्वज फडकवला.
- टांझानिया देशाच्या ईशान्य भागात सीमेजवळ स्थित किलीमांजारो शिखराची उंची 19,341 फूट (5,895 मीटर) इतकी आहे.
- या शिखरावर एकूण तीन ठिकाणी चढाई केली जाते.
- अंकित सोहनी याच्या नेतृत्वाखाली एकूण 14 गिर्यारोहकांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. यात अंकित सोहनी, शशिकांत हिरेमठ, सुभाष पवार, मंगेश गोखले, अनिरुद्ध देशपांडे, वैभवी देशमुख, अंजली हजारी यांनी उहुरू पीक (5,895 मी.) सर केले, तर आसावरी जोशी, सुचेता मोहिते, विक्रम दौंडकर आणि संजय भापकर यांनी ‘स्टेला पॉइंट’वर (5,756 मी.) तिरंगा फडकावला.