माजी लष्करप्रमुख जनरल पद्मनाभन यांचे निधन
- माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांचे चेन्नईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
- त्यांनी 30 सप्टेंबर 2000 ते 31 डिसेंबर 2002 या कालावधीत लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
अल्पपरीचय :
- जन्म: 5 डिसेंबर 1940, त्रिवेंद्रम, केरळ
- डेहराडूनमधील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी) आणि पुण्यातील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एनडीए) या लष्करी शैक्षणिक संस्थांचे ते विद्यार्थी होते.
- इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमधून (आयएमए) शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 13डिसेंबर 1959 रोजी तोफखान्याच्या रेजिमेंटमध्ये – अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या दिमाखदार कारकिर्दीमध्ये अनेक प्रतिष्ठित जबाबदाऱ्यांचा समावेश होता.
- जनरल पद्मनाभन यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी तोफखाना ब्रिगेड आणि माउंटन ब्रिगेड यांचे नेतृत्व केले होते.
- त्यांनी 15 कोअर कमांडर म्हणून बजावलेल्या सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
20 ऑगस्ट : सद्भावना दिवस
- भारतात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी ‘सद्भावना दिन’ साजरा केला जातो.
- सामान्यतः हा दिवस हार्मनी डे म्हणून ओळखला जातो.
- हा दिवस माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा वाढदिवस आहे.
- राजीव गांधी हे एक दूरदर्शी नेते होते. ज्यांनी भारतातील विविध लोकसंख्येमध्ये राष्ट्रीय एकात्मता, शांतता आणि सार्वजनिक सौहार्दासाठी प्रयत्न केले.
सद्भावना दिवस का साजरा केला जातो?
- इंग्रजीत ‘गुडविल’ या शब्दाचा अर्थ ‘सुसंवाद’ असा होतो. राजीव गांधी हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. असे मानले जाते की, तरुण असताना त्याच्याकडे एक अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण विचार प्रक्रिया होती. विकसित राष्ट्राचे त्यांचे स्वप्न होते. ज्याचे नेतृत्व त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतून केले होते.
- विविध धर्म आणि भाषांच्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द वाढवणे हे सद्भावना दिवसाचे प्राथमिक ध्येय आहे. त्यामुळेच हा दिवस साजरा केला जातो.