राष्ट्रीय अवकाश दिन
- चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.
- तसेच चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला.
- भारतीय अंतराळ संस्था इस्रोने गेल्या वर्षी 23 ऑगस्ट 2023 रोजी हा विक्रम केला होता.
- चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा इस्रोकडे होत्या.
- अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उल्लेखनीय कामगिरी ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन (National Space Day 2024) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दरवर्षी 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
- भारत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन देशाच्या प्रगतीवर विचार करण्याची त्याचे योगदान साजरे करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ संशोधनात मोठे उद्दिष्ट ठेवण्याची प्रेरणा देते.
- हा दिवस विज्ञान, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या प्रगतीमध्ये अंतराळ संशोधनाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो.
- राष्ट्रीय अंतराळ दिन 2024 ची थीम –‘चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा’
केंद्रीय गृह सचिवपदी गोविंद मोहन
- ज्येष्ठ आयएएएस अधिकारी गोविंद मोहन केंद्रीय गृह सचिवपदी निवड करण्यात आली.
- अत्यंत संवेदनशील असलेल्या या पदावरील अजयकुमार यांचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे गोविंद मोहन त्यांची जागा घेणार आहेत.
- मोहन यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.टेक. पूर्ण केले, तर अहमदाबाद आयआयएममधून पदविका मिळविलेली आहे.
- मंत्रिमंडळ सचिवानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे पद असलेल्या गृह सचिवपदावर नियुक्ती होण्यापूर्वी मोहन केंद्रीय सांस्कृतिक सचिव म्हणून कार्यरत होते.
- ते सिक्कीम केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांना सिक्कीम आणि केंद्र सरकारच्या विविध पदांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
इकबालसिंह चहल राज्याचे नवे गृह सचिव
- मुख्यमंत्र्यांचे सचिव या पदावर कार्यरत असलेल्या इकबालसिंह चहल यांची आता गृह खात्याचे सचिव या पदावर बदली झाली आहे.
अभिनेता विजयकडून पक्षाचा झेंडा सादर
- तमिळनाडूत दोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेता विजय थलपती सक्रिय झाला असून, त्याने आपल्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ या पक्षाचा झेंडा सादर केला.
- पनैयूर भागात असलेल्या पक्ष कार्यालयात हा ध्वज विजयच्या हस्ते फडकवण्यात आला.
- हा झेंडा दुरंगी असून, त्यात वरील – आणि खालील बाजूला किरमिजी (मरून) रंग आणि मधल्या बाजूला पिवळा अशी रंगसंगती आहे. त्यावर मध्यभागी वागई फूल (तमिळ नाव) असून, त्याच्या दोन्ही बाजूला झुंजणारे हत्ती दाखविण्यात आले आहेत.
- तमिळनाडूत वागईचे फूल हे विजयाचे प्रतीक मानले जाते.
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताला चार सुवर्ण
- अम्मान (जॉर्डन) येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्य स्पर्धेत भारतीयांनी सुवर्णपदाकांचा चौकार मारला.
- अदिती कुमार, नेहा, पुलकित आणि मानसी लाथर यांनी विश्वविजेतेपद मिळवले.
- ग्रीको रोमन प्रकारातील 43 किलो गटात अदिती कुमारने मारिया गिकिकाचा 7-0 असा पराभव केला.
- 65 किलो गटात पुलकितने डारिया फ्रोलवावर 6-3 अशी बाजी मारली, तर मानसी हिने 73 किलो गटात हाना पिर्सक्या हिचा पराभव केला.
- भारताला चौथे सुवर्णपदक नेहाने मिळवून दिले. नेहाने अंतिम सामन्यात सोउ चा पराभव केला.