Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

 पहिल्या रियुजेबल हायब्रीड रॉकेटची गगनभरारी

  • अवकाश संशोधनामध्ये भारताने 24 ऑगस्ट रोजी आणखी एक नवा अध्याय लिहिला.
  • तमिळनाडूतील स्टार्टअप ‘स्पेसझोन इंडिया’ आणि ‘मार्टिन समूहा’ने तयार केलेले पहिले रियुजेबल हायब्रीड रॉकेट ‘आरएचयूएमआय – 1’चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
  • चेन्नईतील थिरुविदंडाई येथील प्रक्षेपण केंद्रावरून मोबाईल लाँचरचा वापर करून हे प्रक्षेपण करण्यात आले.
  • या रॉकेटच्या माध्यमातून 3 क्यूब उपग्रह आणि 50 पिको उपग्रह आकाशात सोडण्यात आले.
  • स्पेस झोनच्या येथील मुख्यालयामध्ये मागील दोन वर्षांपासून ‘मिशन- आरएचयूएमआय’ अंतर्गत विविध प्रकल्पांवर काम केले जात आहे.
  • या रॉकेटला उड्डाणासाठी ऊर्जा देण्याचे काम ‘जेनेरिक फ्युएल बेस्ड हायब्रीड मोटार’ करते.
  • यात इलेक्ट्रिक यंत्रणेचा वापर करून उघडणारे ‘पॅराशूट डिप्लॉयर’ देखील बसविण्यात आले आहे.

वातावरणाचा अभ्यास

  • मोबाईल लाँचपॅडचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आलेले हे जगातील अशा प्रकारचे पहिलेच हायब्रीड रॉकेट असल्याचा दावा ‘मिशन आरएचयूएमआय’कडून करण्यात आला आहे.
  • या रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या तीन क्यूब उपग्रहाच्या माध्यमातून वातावरणाची माहिती, अवकाशातील अतिनील किरणांची तीव्रता आणि हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात येणार असून काही महत्त्वपूर्ण डेटा संकलित करण्याचे कामदेखील ते करतील.
  • याशिवाय विविध प्रकारचे 50 पिको उपग्रहदेखील सोडण्यात आले असून ते वातावरणाचा विविध अंगांनी अभ्यास करतील.

मार्टिन ग्रुपचा आधार

  • या मोहिमेत आणखी वेगळा प्रयोग करण्यात आला असून या मोहिमेसाठी हायड्रॉलिक मोबाईल लाँचपॅडचा वापर करण्यात आला होता.
  • अशा प्रकारच्या लाँचपॅडचा वापर केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • जे तंत्रज्ञान वापरले आहे ते देशाच्या भविष्यातील मोहिमांसाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरेल .
  • या सगळ्या मोहिमेला ‘मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीज’ या उद्योगसमूहाचे मोठे पाठबळ लाभले.
  • कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून या समूहाने या अवकाश मोहिमेला आर्थिक पाठबळ दिले होते.

 ‘विज्ञान धारायोजना

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन प्रमुख योजना यापुढेही सुरू ठेवण्यास मंजुरी दिली.
  • या तीनही योजना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (DST) ‘विज्ञान धारा’ या एकात्मिक केंद्रीय क्षेत्रातील योजनेत विलीन करण्यात आल्या आहेत.

योजनेत तीन व्यापक घटक आहेत:

1) विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण

2) संशोधन आणि विकास

3) नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन

  • पंधराव्या वित्त आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीत ‘विज्ञान धारा’ या एकीकृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित खर्च सुमारे 10,579.84 कोटी रुपये इतका आहे.
  • या तीनही योजनांचे एकाच योजनेत विलीनीकरण केल्याने निधी वापरात कार्यक्षमता वाढेल आणि उप-योजना तसेच कार्यक्रमांमध्ये समन्वय स्थापित होईल.
  • ‘विज्ञान धारा’ योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिसंस्था मजबूत करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता निर्माण तसेच संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देणे, हे आहे.
  • या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये सुसज्ज संशोधन आणि विकास प्रयोगशाळांची संख्या वाढवून देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणखी मजबूत होतील.
  • ही योजना आंतरराष्ट्रीय मेगा सुविधांच्या उपलब्धतेसह मूलभूत संशोधन, शाश्वत ऊर्जा, पाणी इत्यादींमधील अनुवादात्मक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सहकार्याद्वारे सहयोगी संशोधन यासारख्या क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्याचा प्रयत्न करते.
  • हे विज्ञान आणि तंत्रज्ञान परिदृश्य मजबूत करण्यासाठी आणि पूर्ण-वेळ समतुल्य  संशोधक संख्या सुधारण्यासाठी देशाच्या संशोधन आणि विकास आधाराचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानव संसाधन पूल तयार करण्यात देखील योगदान देईल.
  • विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात लैंगिक समानता आणण्याच्या अंतिम उद्दिष्टासह विज्ञान आणि तंत्रज्ञान  क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रित उपाय योजिले जातील.
  • ही योजना शालेय स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत आणि लक्ष्यित उपायांद्वारे उद्योग आणि स्टार्टअपसाठी सर्व स्तरांवर नवोन्मेषाला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळ देईल.
  • शैक्षणिक संस्था, सरकार आणि उद्योग यांच्यातील सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठिंबा दिला जाईल.
  • ‘विज्ञान धारा’ योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेले सर्व कार्यक्रम विकसित भारत 2047 चा दृष्टिकोन साकार करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पाच वर्षांच्या उद्दिष्टांशी संरेखित केले जातील.
  • योजनेतील संशोधन आणि विकास घटक अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या  अनुषंगाने संरेखित केले जातील.
  • या योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत असून ती जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या मापदंडांचे पालन करेल.

 

पार्श्वभूमी:

  • विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे आयोजन, समन्वय आणि प्रोत्साहन यासाठी नोडल विभाग म्हणून काम करतो.
  • देशात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष  यांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे तीन केंद्रीय क्षेत्रातील छत्र योजना पूर्वीपासूनच राबविण्यात येत आहेत.
  • (i) विज्ञान आणि तंत्रज्ञान (S&T) संस्थात्मक आणि मानवी क्षमता निर्माण, (ii) संशोधन आणि विकास आणि (iii) नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास आणि उपयोजन;  या तिन्ही योजना ‘विज्ञान धारा’ या एकीकृत योजनेत विलीन करण्यात आल्या आहेत.

शिखर धवनची निवृत्तीची घोषणा

  • दोन वर्षांपूर्वी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटचा निरोप घेतला.
  • त्यांनी निवृत्ती जाहीर करताना आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सांगता केली.
  • पश्चिम दिल्लीतील या जिगरबाज सलामीवीरचा पहिला आणि अखेरचा  आंतरराष्ट्रीय सामना वनडे होता.
  • तो एकूण 34 कसोटी 127 वनडे आणि 68 टी-20 सामने खेळला.
  • विशाखापट्टणम येथे ऑक्टोबर 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन- डेद्वारे शिखरने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
  • त्यानंतर 2011मध्ये पोर्ट ऑफ स्पेनला यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये, तर 2013 मध्ये मोहालीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
  • डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशविरुद्ध वन-डे सामना खेळला होता.
  • शिखर धवन 34 कसोटी सामन्यात 7 शतके आणि 5 अर्धशतकांच्या बळावर 2,315 धावा बनवल्या.
  • 167 वनडे सामन्यात 17 शतकांसहित 39 अर्धशतकांच्या बळावर 6,793 धावा केल्या. तर 68 टी -2० सामन्यात 11 अर्धशातकांसहित  1,759 धावा केल्या.
  • कसोटी पदार्पणात मोहालीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखरने 187 धावांची खेळी केली होती.
  • ही कसोटी पदार्पणात भारतीय फलंदाजाने नोंदवलेली सर्वोच्च खेळी ठरली आहे. त्याने त्या कसोटीत 85 चेंडूंत शतक झळकावले होते.
  • पदार्पणात केलेले ते वेगवान शतक ठरले होते.
  • आपल्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन हा पहिलाच भारतीय ठरला होता.
  • आतापर्यंत एकूण दहाच फलंदाजांना अशी कामगिरी करता आली आहे .
  • त्याने आपल्या शंभराव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 109 धावा बनवल्या होत्या.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *