राष्ट्रीय शिक्षक दिन
- भारताचेपहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो.
- तेएक महान तत्त्वज्ञ आणि विद्वान होते.
- 1954मध्येत्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आणि 1963 मध्ये त्यांना ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व देण्यात आले.
- डॉ. सर्वपल्लीराधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 188 रोजी मद्रास प्रेसिडेन्सी येथे झाला.
- एकप्रसिद्ध शिक्षक, डॉ. राधाकृष्णन यांनी कोलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले होते.
- तेएक चांगले लेखकसुद्धा होते आणि त्यांनी अमेरिका आणि युरोपमधील व्याख्यानांमधून आंतरसांस्कृतिक समज वाढविण्यास योगदान दिले होते.
भारतात शिक्षक दिनाची सुरुवात
- राधाकृष्णनयांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून कसा साजरा होऊ लागला. याची कथा त्यांच्या नम्रतेचा आणि शिक्षकी कामाविषयीच्या आदराचा पुरावा आहे.
- डॉ. राधाकृष्णन1962 मध्ये भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा काही विद्यार्थी त्यांना भेटायला आले आणि त्यांनी 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. मात्र, विद्यार्थ्यांनी हा दिवस शिक्षकांना समर्पित करावा, अशी सूचना त्यांनी केली.
- अशाप्रकारे 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
शिक्षक दिनाचे महत्त्व
- भारतीयसंस्कृती गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांना खूप महत्त्व देते.
- 5 सप्टेंबरहा शिक्षक दिन केवळ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करत नाही, तर शिक्षकांच्या समर्पण आणि मेहनतीचाही सन्मान करतो.
- विद्यार्थ्यांनाआपल्या आवडत्या शिक्षकांविषयी त्यांची कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करण्याची संधी मिळते. तर शिक्षकांना आत्मनिरीक्षण करण्याची आणि विद्यार्थ्यांसाठी निरोगी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याची संधी मिळते. अशाप्रकारे शिक्षक दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे
‘भंडारदरा‘ जलाशयाला‘ आद्यक्रांतिकारक भांगरेंचे नाव
- अकोलेतालुक्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाला ‘आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ असे नाव देण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय जलसंपदा विभागाने जारी केला आहे.
- यापूर्वीभंडारदरा धरणाचा जलाशय ‘लेक आर्थर हिल’ म्हणूनही ओळखला जात असे.
- याभागात आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे त्यांचे नाव जलाशयाला देण्याची मागणी होत होती.
- त्यालाप्रतिसाद देऊन राज्य सरकारने हे नामकरण केले आहे.
भारताचा विकासात्मक धोरणाला पाठिंबा
- ब्रुनेईदौऱ्यादरम्यान ‘भारत विस्तारवादाच्या नव्हे तर विकासात्मक धोरणाचे समर्थन करतो,’ असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले.
- दोनदिवसांच्या ब्रुनेई दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय भेटीचा 4 सप्टेंबर रोजी समारोप झाला.
- यावेळी दोन्ही देशांतील जलवाहतूक स्वातंत्र्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
- पंतप्रधानमोदींनी सुलतान हसनल बोलकिया यांच्याशी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणुकीवर व्यापक चर्चा केल्यामुळे भारत आणि ब्रुनेईमधील संबंधांमध्ये वाढ झाली आहे.
प्रादेशिक, जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय
- दोन्हीदेशांतील नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक, अन्न सुरक्षा, शिक्षण, ऊर्जा, अंतराळ तंत्रज्ञान, आरोग्य, क्षमता निर्माण, संस्कृती आदी विविध विषयांचा समावेश होता.
- आयसीटी, फिनटेक, सायबरसुरक्षा, नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये शोध आणि पाठपुरावा करण्याचे दोन्ही देशांनी या वेळी मान्य केले.
- दोन्हीनेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय केला. या वेळी दहशतवादासह इतर कृत्यांचा निषेध करण्यात आला.
- ब्रूनेईभेटीनंतर सिंगापूरला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ब्रुनेई भेटीचे वर्णन ‘उत्पादक‘ म्हणून केले. तसेच भारत आणि ब्रूनेई संबंधांच्या नवीन युगाची सुरुवात करत असल्याचेही ते म्हणाले.
भारतीय नौदल आणि दक्षिण आफ्रिकी नौदल यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी करार
- दक्षिणआफ्रिकी नौदलाच्या पाणबुड्यांवरील कर्मचाऱ्यांची अपघात किंवा दुर्घटनेच्या वेळी सुरक्षितता निश्चित करण्याबाबत अंमलबजावणी करारावर भारतीय नौदल आणि दक्षिण आफ्रिकी नौदल यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
- त्यामुळेसमुद्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यातील महत्त्वाचा मैलाचा टप्पा गाठला गेला आहे.
- भारतीयनौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि दक्षिण आफ्रिकी नौदल प्रमुख व्हाईस ॲडमिरल माँडे लोबेस यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- नौदलसुरक्षा आणि परस्पर सहयोगाप्रती वचनबद्धता या अंमलबजावणी कराराने अधोरेखित केली आहे.
- याकरारांतर्गत, भारतीय नौदल आवश्यकता भासेल तेव्हा आपले खोल बुडी मारणारे बचाव वाहन वापरून सहकार्य करेल जेणेकरून दोन्ही नौदलांमधील सहकार्याला अधिक पाठबळ मिळेल.
- ही भागीदारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सागरी क्षेत्रातील संबंध दृढ करणारी आहे.
हरविंदरला तिरंदाजीत सुवर्ण
- भारतीयतिरंदाज हरविंदर सिंगने पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
- रिकर्व्हप्रकाराच्या अंतिम फेरीत हरविंदरने पोलंडच्या लुकास सिझेकचा एकतर्फी लढतीत सलग तीन सेट जिंकताना 6-0(28-24, 28-27, 29-25) असा पराभव केला.
- तिरंदाजीतसुवर्णपदक मिळविणारा हरविंदर भारताचा पहिला तिरंदाज ठरला.
- हरविंदरनेटोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
- पॅरिस स्पर्धेत भारताचे हे चौथे सुवर्ण आणि एकूण 22 वे पदक ठरले.
महाराष्ट्राच्या सचिन खिलारीचे रौप्यपदक
- महाराष्ट्रातीलसांगली जिल्ह्यातून आलेल्या सचिन खिलारीने पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘एफ 46’ वर्गीकरणातील पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्यपदक पटकावले.
- सचिनने32 मीटर गोळाफेक करताना आशियाई विक्रमाचीही नोंद केली.
- याचवर्षी मे महिन्यात जपानमध्ये झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत 34 वर्षीय सचिनने सुवर्णपदक मिळवताना30 मीटरचा आशियाई विक्रम प्रस्थापित केला होता.
शरदचे रूपेरी यश
- भारताच्याशरदकुमारने पॅरालिम्पिकमधील पॅरा ॲथलेटिक्समधील उंच उडीच्या टी-63 गटात रौप्यपदक मिळवले.
- याच प्रकारात मरियप्पन थांगावेलू याने कांस्यपदक जिंकले.
अजितसिंगला रौप्य पदक
- भारताच्याअजितसिंगने पुरुषांच्या भालाफेकीतील एफ-46प्रकारात रौप्यपदक जिंकले, तर सुंदरसिंग गुर्जर याने कांस्यपदकाची कमाई केली.