बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश
- भारताच्यापुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांनी इतिहास रचला.
- दोन्हीसंघांनी अफलातून कामगिरी करून 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
- भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश मिळवले.
- अंतिमफेरीत भारताच्या पुरुष संघाने स्लोव्हेनियावर, तर महिला संघाने अझरबैजान संघावर मात केली.
- भारताच्यापुरुष संघाने यापूर्वी 2014 आणि 2022च्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
- भारताच्यामहिला संघाने चेन्नईत झालेल्या 2022मधील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
- करोनाकाळात 2020 आणि 2021मधील स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. यात पुरुष आणि महिला संघ एकत्रित करण्यात आले होते.त्यात 2022मधील स्पर्धेत भारतीय संघ रशियासह संयुक्त विजेता ठरला होता.
- बुद्धिबळऑलिम्पियाडमध्ये एकाच वेळी दोन्ही स्पर्धा जिंकणारा भारत हा केवळ सातवा संघ ठरला आहे.
- एकाचऑलिम्पियाडमध्ये दोन्ही सांघिक स्पर्धा जिंकण्याचा प्रसंग 2018 नंतर प्रथमच घडला.
- 2018 मध्येचीनने हे यश मिळवले होते.
- भारताचापुरुष संघ: आर. प्रज्ञानंद , पी. हरिकृष्णा, डी. गुकेश, विदित गुजराती, अर्जुन एरिगेसी
- महिलासंघ: आर. वैशाली, तानिया सचदेव, डी. हरिका, वंतिका अगरवाल, दिव्या देशमुख