दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना साहित्याचे नोबेल
- दक्षिणकोरियाच्या लेखिका हान कांग (वय 53) यांना साहित्याचे नोबेल जाहीर झाले.
- स्वीडिशअॅकॅडमीच्या नोबेल समितीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माम यांनी पुरस्काराची घोषणा केली.
- स्त्रियांचीअसुरक्षितता, स्त्रियांचे जीवन यांच्याबद्दल कायमच हान सक्रिय असतात.
- नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या हान या पहिल्या आशियाती महिला आणि दक्षिण कोरियातील पहिल्या महिला लेखिका ठरल्या आहेत.
- दक्षिणकोरियामध्ये नोबेल जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या आहेत.
- दक्षिणकोरियाचे माजी अध्यक्ष किम दाइ जंग यांना सन 2000 मध्ये शांततेचा पुरस्कार मिळाला होता. दक्षिण कोरियामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
- कांगयांना त्यांच्या ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर सन्मान 2016 मध्ये जाहीर झाला होता.
- एकामहिलेच्या मांसाहार खाणे थांबविण्याच्या निर्णयाचे विचित्र परिणाम उलगडून सांगणारी ही कांदबरी आहे.
कांग 1993 पासून साहित्यक्षेत्रात
- दक्षिणकोरियातील ग्वांग्जू शहरात 1970 मध्ये कांग यांचा जन्म झाला.
- लेखनाचेबाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांचे वडील कादंबरीकार होते. त्यांनी सुरुवातीला कविता केल्या.
- नंतर कथेच्या माध्यमातून लिहायला सुरुवात केली.
- हान या 1993 मध्ये कवयित्री म्हणून सर्वांसमोर आल्या.
- त्यांचापहिला लघुकथासंग्रह 1994मध्ये प्रसिद्ध झाला.
- 1998 मध्येत्यांनी ‘ब्लॅक डिअर’ ही पहिली कादंबरी लिहिली.
- ‘द व्हेजिटेरियन’, ‘ग्रीक लेसन्स’, ‘ह्युमन अॅक्ट्स’ आणि ‘द व्हाइट बुक’ यांचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले आहे.
- ‘वुईडू नॉट पार्ट’ हे त्यांची आगामी कादंबरी आहे.
21वी आसियान–भारत शिखर परिषद 2024
- लाओसचीराजधानी व्हिएन्टिन येथे 10 ऑक्टोबर 2024 रोजी 21वी आसियान-भारत शिखर परिषद पार पडली.
- भारताच्या‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाचे दशक पूर्ण होत असताना, आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील सहकार्याची दिशा ठरवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘आसियान’ नेत्यांच्या या परिषदेत सहभागी झाले.
- पंतप्रधानांचाया शिखर परिषदेतील हा 11 वा सहभाग होता.
- आपल्याभाषणात पंतप्रधान मोदी यांनी आसियान देशांचे ऐक्य, आसियान केंद्रित धोरण आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्राबाबत आसियान देशांच्या दृष्टीकोनाला भारताचा पाठींबा असल्याचा पुनरुच्चार केला.
- 21व्याशतकाला आशियाई शतक म्हणून संबोधित करत, त्यांनी भारत आसियान संबंध आशिया खंडाच्या भविष्याला दिशा देण्यासाठी महत्वाचे असल्याचे नमूद केले.
- भारताच्या‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाच्या गतिशीलतेवर भर देत पंतप्रधानांनी नमूद केले की, गेल्या दहा वर्षांत भारत-आसियान व्यापार दुप्पट वाढून तो 130 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर पोहोचला, आसियान आज भारताच्या सर्वात मोठ्या व्यापार आणि गुंतवणूक भागीदारांपैकी एक आहे, सात आसियान देशांशी थेट विमान सेवेद्वारे संपर्क प्रस्थापित करण्यात आला, आसियान क्षेत्रात फिन-टेक सहकार्याने केलेली सुरुवात आशादायक आहे आणि पाच आसियान देशांचा सामायिक सांस्कृतिक वारसा पुनर्संचयित करण्यात क्षणीय प्रगती झाली.
- आसियान-भारतयेथील मोठ्या आर्थिक क्षमतेचा उपयोग करून तिथल्या समुदायाला त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी आसियान भारत परराष्ट्र व्यापार कराराचा आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
- पंतप्रधानांनीनालंदा विद्यापीठात आसियान देशांच्या तरुणांना शिष्यवृत्ती प्रदान करून भारत आसियान ज्ञान भागीदारीत झालेल्या प्रगतीबद्दलही माहिती दिली.
- आसियानसदस्य राष्ट्रांमध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, भारत, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया आणि ब्रुनेई यांचा समावेश आहे. तर, पूर्व आशिया देशांमध्ये ‘आसियान’च्या दहा देशांसह ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, रशिया आणि अमेरिका या आठ भागीदार देशांचा समावेश आहे.
उद्योगरत्न पुरस्काराला रतन टाटांचे नाव
- राज्यशासनाकडून देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराचे नामकरण आता ‘रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार’ असे करण्यात आले आहे.
- यापुरस्काराची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती आणि पहिला पुरस्कार टाटा यांनाच देण्यात आला होता.
- ज्येष्ठउद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला.
- टाटायांचा आर्थिक, औद्योगिक व सामाजिक समृद्ध वारसा देशातील व राज्यातील संपूर्ण उद्योग जगताला प्रेरणादायी ठरणार आहे.
- त्यांचाहा वारसा पुढे चिरंतन राहावा ,त्यांच्या अतुलनीय कार्याची निरंतर स्मृती रहावी यासाठी राज्य सरकारने उद्योग रत्न पुरस्काराचे नामकरण ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ असे करण्याचा निर्णय घेतला.
माजी पोलीस महासंचालक वसंत सराफ यांचे निधन
- महाराष्ट्रराज्य स्थापन होण्याआधी तत्कालीन द्वैभाषिक राज्याच्या पोलीस सेवेत रुजू झालेले आणि राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक संत केशव सराफ यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
- वसंतसराफ यांचा जन्म विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे झाला.
- 1 जानेवारी1990 रोजी ते राज्याचे पोलीस महासंचालक झाले.
- ऑगस्ट1992 ला ते निवृत्त झाले.
- त्यांनीपोलिस खात्यातील प्रदीर्घ अनुभवावर आधारित वृत्तपत्रीय लेखन, कादंबरी आणि कथा असे लेखन केले आहे.
- व्यवस्थापनआणि नेतृत्व या विषयांवरही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
- भगवद्गीतेतीलकर्म या विषयावर सराफ यांनी लिहिलेले ‘द मिस्ट्री ऑफ कर्म’ (कर्माचं गूढ) हे पुस्तक लोकप्रिय ठरले होते.
- सराफयांना पोलिस पदक, राष्ट्रपती पदक; तसेच ‘इंटरनॅशनल जायंट्स अॅवार्ड फॉर पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन’ या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
- पोलिसदलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना – उपराष्ट्रपतींच्या हस्ते ‘नॅशनल सिटीझन्स – अॅवार्ड’ मिळाले होते.
राफेल नदालची निवृत्तीची घोषणा
- क्लेकोर्टवर रंगणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेत 14 जेतेपदे आणि केवळ 4 पराभव अशी ‘ना भूतो, ना भविष्यती’ कामगिरी करून ‘लाल मातीचा बादशाह’ अशी ख्याती मिळवलेल्या स्पेनच्या राफेल नदालने पुढील महिन्यात मायदेशात होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यानंतर टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- एकीकडेरॉजर फेडरर आपल्या नजाकदार खेळाने टेनिसप्रेमींना भुरळ घालत असतानाच, तडाखेबाज खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या डावखुऱ्या नदालचा उदय झाला.
- फेडररच्याउपस्थितीत आपली वेगळी ओळख निर्माण करणे तितकेसे सोपे नव्हते. मात्र, हे आव्हान नदालने खुबीने पेलले.
- पुढेजाऊन नोव्हाक जोकोविच या पंक्तीत समावेश झाला आणि या त्रिकूटाने टेनिस विश्वावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.
नदालची ग्रँड स्लॅम विजेतेपद:
- फ्रेंचओपन – 14
- अमेरिकनओपन – 04
- ऑस्ट्रेलियनओपन – 02
- विम्बल्डन- 02
- एकूणविजेतेपद – 22