निहोन हिदानक्यो संस्थेला शांततेचे नोबेल
- अमेरिकेनेजपानवर 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर केलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यातून वाचलेल्यांसाठी काम करणाऱ्या जपानच्या ‘निहोन हिदानक्यो’ या संस्थेला 2024 या वर्षाचा शांततेसाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
- अण्वस्त्रांविरोधातहीही संस्था सक्रियपणे काम करीत आहे.
संस्थेची पार्श्वभूमी
- अणवस्त्रांच्यानरसंहारानंतर त्याचे दुष्परिणाम जगासमोर आणण्यासाठी आणि त्याचा फटका बसलेल्या कुटुंबीयांना पुन्हा मदतीचा हात द ण्यासाठी काम करणाऱ्या महत्त्वाच्या संघटनांमध्ये निहोन हिदानक्यो ही संस्था ओळखली जाते.
- 10 ऑगस्ट1956 रोजी संस्थेची स्थापना झाली असून, टोकियोमध्ये संस्थेचे मुख्यालय आहे.
- जागतिकआण्विक निःशस्त्रीकरणाची बाजू मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांकडे वार्षिक शिष्टमंडळ पाठविणे, अणवस्त्रांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे.
- ‘निहोनक हिदानक्यो’चे अध्यक्ष : तोमोयुकी मिमाकी
- 2023 चाशांततेसाठी पुरस्कार इराणच्या मानवतावादी कार्यकर्त्या नर्गिस महम्मदी यांना देण्यात आला होता.