Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

'टाटा ट्रस्ट'च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

जागतिक भूक निर्देशांक – 2024

  • जागतिकभूक निर्देशांक GHI – ‘जीएचआय’ म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स या वार्षिक अहवालाच्या माध्यमातून जागतिक, क्षेत्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर उपासमारीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाते व त्यातून दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक जाहीर केला जात .
  • यावर्षीच्याभूक निर्देशांकाने भारतात चिंताजनक व वाईट परिस्थिती सांगितली.
  • चीन, बांगलादेश, नेपाळव श्रीलंका यांच्यापेक्षाही आपली स्थिती खालावलेली असल्याचे वास्तव निर्देशांकातून उघड झाले आहे.
  • 127 देशांच्यायादीत भारताचे स्थान 105 वर आहे.
  • भारतातील7 टक्केकुपोषित आहेत.
  • एवढेचनव्हे तर बालकांच्या उंचीवर आधारित कमी वजनाचा दर म्हणजे अल्पपोषण दर सर्वाधिक5 टक्के असल्याची गंभीर बाबही नोंदवली गेलेली आहे.
  • जागतिकभूक निर्देशांक यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने चार महत्त्वाचे निकष आधारभूत मानले जातात.
  • यामध्येकुपोषण, पाच वर्षांच्या खालील मुलांना त्यांच्या उंचीच्या तुलनेत किती कमी आहार मिळतो, पाच वर्षांच्या खालील किती मुलांची त्यांच्या वयाच्या तुलनेत उंची कमी आहे आणि दरहजारी आकड्यामागे पाच वर्षांखालील किती मुले दगावतात या निकषांच्या आधारे जागतिक भूक निर्देशांकाची मांडणी केली जाते.
  • याअहवालात जी गणना करण्यात आलेली आहे त्यामध्ये चार निर्देशांक पद्धती वापरण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी तीन या मुलांच्या आरोग्याशी संबंधित आहेत.
  • जागतिकभूक निर्देशांकाचा हा 2024 चा 19 वा  अहवाल  आयरिश मानवतावादी संस्था कंसर्न वर्ल्डवाईड आणि जर्मन मदत एजन्सी वेल्थंगरहिल्फ यांनी प्रकाशित केला आहे .

पार्श्वभूमी

  • 2006 मध्येतयार केलेले, GHI सुरुवातीला यूएस-आधारित इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट (IFPRI) आणि जर्मनी आधारित Welthungerhilfe द्वारे प्रकाशित केले गेले .
  • 2007 मध्ये, आयरिशएनजीओ कन्सर्न वर्ल्डवाइड देखील सह-प्रकाशक बनले.
  • 2018 मध्ये, IFPRI नेप्रकल्पातून माघार घेतली आणि GHI हा Welthungerhilfe आणि Concern Worldwide चा संयुक्त प्रकल्प बनला.

 ‘टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड

  • ‘टाटा ट्रस्ट’च्या अध्यक्षपदी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली  आहे.
  • विश्वस्तमंडळाकडूनच नोएल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
  • नोएलयांनी रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केले होते.
  • नोएलयांच्याकडे ‘टाटा ट्रस्ट’ची पूर्ण जबाबदारी असेल त्यात सर रतन टाटा ट्रस्ट आणि त्याच्याशी संबंधित अन्य ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि त्याच्याशी संलग्न अन्य ट्रस्टचा समावेश असेल.
  • याट्रस्टकडेच ‘टाटा सन्स’मधील 66 टक्क्यांपेक्षा अधिक समभाग आहेत.

नोएल टाटा यांच्याविषयी

  • नवलटाटा आणि सिमोन टाटा यांचे सुपुत्र असलेले नोएल नवल टाटा यांचा जन्म 1957 साली झाला.
  • टाटाउद्योगसमूहातील ट्रेन्ट लिमिटेड, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन यांचे ते अध्यक्ष आहेत.
  • तसेचटाटा इंटरनॅशनलचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत.
  • टायटनकंपनी आणि टाटा स्टील यांचे ते उपाध्यक्ष आहेत.
  • टाटासमूहामध्ये ते चार दशकांपासून आहेत.
  • नोएलटाटा हे रतन टाटा आणि त्यांचे बंधू जिमी टाटा यांचे सावत्र बंधू आहेत.
  • ससेक्सविद्यापीठातून त्यांनी पदवी संपादन केली आहे.
  • फ्रान्समधीलइनसीड बिझनेस स्कूलमधून त्यांनी इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
  • आपल्याकारकीर्दीची सुरुवात नोएल यांनी टाटा इंटरनॅशनलपासून केली.
  • जून1999 मध्ये ट्रेन्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक.
  • ट्रेन्टया कंपनीचा स्थापना त्यांची आई सिमोने टाटा यांनी केली आहे.
  • नोएलटाटा यांच्या कारककिर्दीत लिट्लवूड्स इंटरनॅशनल हे डिपार्टमेन्टल स्टोअर अधिग्रहित केले आणि त्याचे नाव वेस्टसाइड असे ब लले.
  • आजवेस्टसाइड हा नामांकित ब्रँड आहे.
  • सन2003 मध्ये टायटन इंडस्ट्रीज आणि व्होल्टास या कंपन्यांचे संचालक.
  • सन2010-11 मध्ये नोएल टाटा यांची नियुक्ती टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून केली गेली.
  • सन2018मध्ये टायटन कंपनीचे ते उपाध्यक्ष झाले.
  • सन2019मध्ये नोएल टाटा हे सर रतन टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाचे सदस्य बनले.
  • 29 मार्च2022 रोजी टाटा स्टीलचे उपाध्यक्ष झाले.
  • 11 ऑक्टोबर2024 रोजी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष.

घर घर संविधान

  • राज्यभरातीलसर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक  संस्थांमध्ये ‘घर घर संविधान’ एक अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारतर्फे  नुकतीच करण्यात आली आहे.
  • उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या  सूचनेनुसार ही संकल्पना राबविण्यात  येत आहे.
  • याउपक्रमाच्या माध्यमातून  सामाजिक न्याय व राष्ट्रवादाची  भावना वाढवण्याचा सरकारचा मानस हे आहे.
  • यामहोत्सवाचा एक भाग म्हणून  शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये संविधानाची उद्दिष्टे लावण्याचे आदेश दिले आहेत.

 भारताचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम

  • हैदराबाद येथे झालेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी- ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाने सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नोंदविला .
  • सामन्यातभारताने 20 षटकांत 6 बाद 297 धावा फटकावल्या.
  • कसोटीसंघाचा दर्जा असलेल्या संघाची ही ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
  • भारतानेअफगाणिस्तानला मागे टाकले.
  • अफगाणिस्तानने2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध 3 बाद 278 धावा केल्या होत्या.
  • तसेचगेल्या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्ध नेपाळने 20 षटकांत 3 बाद 314 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, नेपाळला ‘आयसीसी’कडून कसोटी संघाचा दर्जा देण्यात आलेला नाही.
  • संजूसॅमसनने अवघ्या 40 चेंडूंत शतक पूर्ण केले.
  • आंतरराष्ट्रीयट्वेन्टी-20 सामन्यात भारताकडून हे दुसरे सर्वांत जलद शतक ठरले.
  • सर्वांतजलद शतकाचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूंत शतक केले होते.
  • हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी विक्रमी धावसंख्या उभारताना 22 षटकारांची आतषबाजी केली.
  • आंतरराष्ट्रीयट्वेन्टी-20 सामन्यात भारतासाठी हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *