स्वच्छ हात धुण्याचा दिवस
- जागतिकहात धुण्याचा दिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस रोग टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी साबणाने हात धुण्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास
- पहिलाजागतिक हात धुण्याचा दिवस 15 ऑक्टोबर 2008 रोजी साजरा करण्यात आला होता.
- त्यादिवशी 70 देशांमध्ये 120 दशलक्षाहून अधिक मुलांनी साबणाने हात धुतले होते.
- जागतिकहात धुण्याचा दिवस हा जगातील सर्वात मोठ्या जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे.
हात धुण्याचे महत्त्व:
- हातधुणे हे आजाराविरुद्ध एक शक्तिशाली संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्याचा आधारस्तंभ आहे.
- हातधुणे ही आपल्या शारीरिक स्वच्छतेची पहिली पायरी आहे.
- हातधुणे ही एक सवय आहे जी सर्व मुलांनी विकसित केली पाहिजे.
- हातधुणे हे संक्रमण प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
- ग्लोबलहँडवॉशिंग डे 2024 ची थीम आहे “एकत्रितपणे, आपण संक्रमण टाळण्यासाठी आणि आरोग्य सेवेमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधनाचा सामना करण्यासाठी प्रयत्नांना गती देऊ या. हाताच्या स्वच्छतेला प्राधान्य देऊन सुरक्षितता आणि गुणवत्तेची संस्कृती जोपासूया.”
- ग्लोबलहँडवॉशिंग डे 2024 चे घोषवाक्य: “एकत्रितपणे कृतीला गती द्या. जीव वाचवा: आपले हात स्वच्छ करा.
अतुल परचुरे यांचे निधन
- अष्टपैलूअभिनयाच्या जोरावर मराठी हिंदी चित्रपट सृष्टी रंगमंच आणि टीव्ही मालिका गाजवणारे अतुल परचुरे यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 57 व्या वर्षी निधन झाले.
अल्पपरीचय
- जन्म:30 नोव्हे.1966,वांद्रेमुंबई
- अतुलपरचुरे यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
- त्यानंतरत्यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली.
- अनेकनाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.
- केवळरंगभूमीवरच नाही, तर हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपट अशी त्यांची वाटचाल होती.
- मध्यंतरीच्याकाळात त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराला सामोरे जावे लागले.
- त्यांच्यावररुग्णालयात उपचार सुरू होते. या गंभीर आजारातून ते सावरले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा कामालाही सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि त्यामुळे काही दिवसांपूर्वी ते रुग्णालयात दाखल झाले होते आणि त्यांची प्राणज्योत 14 ऑक्टोबर रोजी मालवली.
- ‘व्यक्तीआणि वल्ली’तील ‘पुलं’ साकारताना प्रत्यक्ष पु.ल. देशपांडे यांच्याकडूनच दाद मिळवणाऱ्या परचुरे यांनी ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘नातीगोती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘बे दुणे पाच’ आदी नाटकांत केलेल्या भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.
ज्ञानेश्वर मुळे यांना चिंतामणराव देशमुख पुरस्कार
- दिल्लीत होणाऱ्या 98 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्काराच पहिले मानकरी पासपोर्टमन अशी ओळख असलेले लेखक ज्ञानेश्वर मुळे ठरले.
- नवीन महाराष्ट्र सदन येथे 16 ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तर माजी राज्यपाल यांनी होरा यांच्या ध्यक्षतेखाली मुळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
- मुळे यांनी जपान, रशिया, सीरिया ,मालदीव, अमेरिका येथे राजदूत म्हणून सेवा बजावली.
- मराठी अस्मतेसाठी त्यांनी केलेल्या अन्यन्यसाधारण कामगिरीची गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
- मानचिन्ह,गौरवपत्र तसेच 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.



