प्रिडेटर ड्रोन : भारत अमेरिका यांच्यात करार
- भारताचीचीनबरोबर सीमा अधिक भक्कम व्हावी, यासाठी भारताने अमेरिकेबरोबर सुमारे चार अब्ज अमेरिकी डॉलरचा (32 हजार कोटी रुपये) 31 प्रीडेटर ड्रोन खरेदीचा करार दिल्लीत केला.
- अमेरिकेतील”जनरल अॅटॉमिक्स’ कंपनी भारताला हे ड्रोन पुरविणार आहे.
- अमेरिकेने’परकी लष्करांसाठी शस्त्रविक्री’ अंतर्गत हा करार केला.
- मागीलआठवड्यात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटच्या सुरक्षा समितीने (सीसीएस) ड्रोन खरेदीला मान्यता दिली.
- जनरलअॅटॉमिक्स’चे मुख्य कार्यकारी – अधिकारी विवेक लॅल यांची या – करारात महत्त्वाची भूमिका राहिली.
- खरेदीकरण्यात आलेल्या – ड्रोनपैकी भारतीय नौदलाला 15 – ‘सी गार्डियन’ ड्रोन, तर हवाई दल आणि लष्कराला प्रत्येकी 8 – ‘स्काय गार्डियन’ ड्रोन मिळतील.
- ‘सीगार्डियन’ ड्रोन विविध -प्रकारची भूमिका बजावू शकतात. – यामध्ये सागरी टेहळणी, पाणबुडीविरोधी युद्धात आणि दूर – अंतरावरील लक्ष्यभेद करण्यासाठी – या ड्रोनचा वापर होऊ शकतो.
- सुरक्षादलांची टेहळणी क्षमता अधिक भक्कम करण्यासाठी भारत प्रामुख्याने ड्रोन ची खरेदी करीत आहे याचा उपयोग चीन सीमेवर ठ कपणे होणार आहे.
वैशिष्ट्ये
- ‘एमक्यू-9 बी’ हेड्रोन ‘एमक्यू-9 रीपर’ या ड्रोनची सुधारित आवृत्ती आहे.
- अमेरिकेनेअल कायदा या दहशतवादी संघटनेचा नेता अयमान अल जवाहिरीला मारण्यासाठी ‘एमक्यू-9रीपर’ याच ड्रोनवरून हेलफायर हे क्षेपणास्त्र डागले होते. जुलै 2022 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती.
- सलग35 तास हवेत राहण्याची या ड्रोनची क्षमता असून ते हेलफायर क्षेपणास्त्रासह 450 किलो स्फोटकेही वाहून नेऊ शकते.
- दीर्घपल्ला आणि उंचावरून उडण्याची क्षमता.
- सागरीपाळत ठेवण्यासह पाणबुडीविरोधी युद्धक्षमता वाढविण्याचा हेतूही या खरेदीमागे आहे. या ड्रोनसाठी भारत अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होता.
विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे
- महाराष्ट्रराज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे हे कायम राहिले आहेत.
- यादोन्ही मंडळांची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
- विश्वकोशनिर्मिती मंडळाच्या उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये यांची; तर साहित्य व संस्कृती मंडळाच्या उपाध्यक्षपदी प्रदीप ढवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मागीलकार्यकाळात विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखक संशोधक डॉक्टर राजा दीक्षित यांनी भूषवले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा
- अवघ्यादेशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची अखेर घोषणा झाली.
- केंद्रीयनिवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात राज्यात मतदान होणार आहे.
- यासोबतचझारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला असून, तेथे 13 आणि 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होईल.
- दोन्हीराज्यांच्या निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होतील.
- निवडणूकआयुक्त राजीवकुमार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
महाराष्ट्रातील एकूण मतदार व मतदान केंद्रे
- एकूणमतदार : 9.63 कोटी
- पुरुष : 4.97 कोटी
- महिला: 4.66 कोटी
- प्रथमचमतदान करणारे : 20.93 लाख
- युवामतदार (20 ते 29 वयोगट) : 1.85 लाख
- तृतीयपंथी: 5,997
- दिव्यांग: 3 लाख 67 हजार
एकण मतदान केंद्रे : 1 लाख 86 हजार
- शहरी: 42 हजार585
- ग्रामीण: 57 हजार 601
भारत आणि कोलंबिया यांच्यात चित्रपट सह–निर्मिती आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी करार
- भारतआणि कोलंबिया यांनी ऑडिओ-व्हिज्युअल अर्थात दृक-श्राव्य सह-निर्मिती करारावर स्वाक्षरी केली आहे ज्यामुळे भारतीय आणि कोलंबियन चित्रपट निर्माते चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंवर सहकार्यास ठी मंच वापरास सक्षम होतील.
- याकरारामुळे दोन्ही देशांच्या चित्रपट उद्योगातील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील संबंध अधिक दृढ होऊन सहकार्याचा नवा अध्याय उलगडेल अशी अपेक्षा आहे.
- याकरारावर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि कोलंबियाचे उप परराष्ट्र व्यवहार मंत्री जॉर्ज एनरिक रोजास रॉड्रिग्ज यांनी स्वाक्षरी केली.
- कोलंबिया- भारतासोबत दृक-श्राव्य सह-उत्पादन करारावर स्वाक्षरी करणारा 17 वा देश ठरला
- भारतआणि कोलंबिया यांच्यातील करारामुळे दोन्ही देशांतील निर्मात्यांना त्यांच्या सर्जनशील, कलात्मक, तांत्रिक, आर्थिक आणि विपणन संसाधनांचा सह-उत्पादनासाठी फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
- यामुळेकला आणि संस्कृतीची देवाणघेवाण होईल आणि दोन्ही देशांतील लोकांमध्ये सद्भावना निर्माण होईल आणि सांस्कृतिक संबंधांना चालना मिळेल.
- याकरारामुळे भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ तयार करण्याची आणि त्याचे प्रदर्शन करण्याची आणि पोस्ट प्रॉडक्शन आणि मार्केटिंगसह चित्रपट निर्मितीमध्ये गुंतलेल्या कलात्मक, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक मानव संसाधनांमध्ये रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होईल.
विविध देशांसोबत दृकश्राव्य सह–उत्पादन करार
- यापूर्वी, भारतसरकारने 2005 मध्ये इटली, युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि नॉर्दर्न आयर्लंड सरकार, 2007 मध्ये जर्मनी आणि ब्राझील, 2010 मध्ये फ्रान्स, 2011 मध्ये न्यूझीलंड, 2012 मध्ये पोलंड आणि स्पेन सरकार सोबत अशाचप्रकारचे करार केले होते.
- नजीकच्याकाळात म्हणजे 2014 मध्ये कॅनडा आणि चीन, 2015 मध्ये कोरिया, 2016 मध्ये बांगलादेश, 2017 मध्ये पोर्तुगाल, 2018 मध्ये इस्रायल, 2019 मध्ये रशिया आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया सरकार सोबत करार केले.
भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून परमेश शिवमणी यांची निवड
- परमेशशिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) 26 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.
- फ्लॅगऑफिसर शिवमणी यांनीं आपल्या साडेतीन दशकांहून अधिक काळातील गौरवशाली कारकिर्दीत विविध पदांवर काम केले आहे.
- डीजीपरमेश शिवमणी हे दिशादर्शन आणि संचालन यातील तज्ज्ञ असून त्यांच्या सागरी जबाबदारीत भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व प्रम ख नौकांवर त्यांनी काम केले आहे.
- यातप्रगत ऑफशोर गस्ती जहाज ‘समर’ आणि ‘विश्वस्त’ यांचा समावेश आहे.
- फ्लॅगऑफिसर शिवमणी यांनी तटरक्षक क्षेत्र (पूर्व), तटरक्षक क्षेत्र (पश्चिम), तटरक्षक दल कमांडर इस्टर्न सी बोर्ड इथले प्रमुखपद भूषवले आहे.
- तेनॅशनल डिफेन्स कॉलेज, नवी दिल्ली आणि डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत.
- परमेशशिवमणी यांना सप्टेंबर 2022 मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना तटरक्षक दल मुख्यालय, नवी दिल्ली येथे नियुक्त करण्यात आले.
- त्यांच्याकडेऑगस्ट 2024 मध्ये तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.या कालावधीत अनेक मोहिमा आणि सराव पूर्ण करण्यात आले.
- यातमादक द्रव्य/अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती आणि किनारी सुरक्षा सरावादरम्यान मानवतावादी साहाय्य, तीव्र चक्रीवादळात खलाशांची सुटका, परदेशी तटरक्षक दलांसोबत संयुक्त सराव, प्राण्यांच्या तस्करीविरोधात कारवाई, यांचादेखील यात समावेश आहे.
- फ्लॅगऑफिसर शिवमणी यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल 2014 मध्ये तटरक्षक पदक आणि 2019 मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक प्रदान करण्यात आले.
- त्यांना2012 मध्ये डीजी तटरक्षक दल प्रशंसा आणि 2009 मध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (पूर्व) प्रशंसा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहेत.
भारतीय तटरक्षक दल :
- (स्थापनेचीघोषणा 1 फेब्रुवारी 1977)
- स्थापना: 18 ऑगस्ट 1978
- मोटो: वयंमरक्षाम:
- मुख्यालय: नवी दिल्ली
- 1 फेब्रुवारी: तटरक्षक दल दिन