Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

धर्मा प्रॉडक्शन मध्ये पूनावालांची भागीदारी

धर्मा प्रॉडक्शन मध्ये पूनावालांची भागीदारी

व्हिएतनामचे अध्यक्षपदी लुओंग कुओंग

  • व्हिएतनामच्याअध्यक्षपदी लष्करी अधिकारी लुओंग कुओंग यांची निवड करण्यात आली.
  • गेल्या18 महिन्यांत अध्यक्षपदी निवड होणारे ते चौथे लष्करी अधिकारी ठरले आहेत.
  • तेहंगामी अध्यक्ष टो लाम यांची जागा घेतील. नॅशनल असेंब्लीने  कुओंग यांची निवड केली.
  • कुओंग40 वर्षे लष्करी सेवा करून निवृत्त झाले आहेत.
  • सन2021मध्ये त्यांची व्हिएतनामी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोमध्ये नियुक्ती झाली होती.
  • व्हिएतनामचेते  14 वे अध्यक्ष आहेत.
  • लुओंगकुओंग यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 उत्तर व्हिएतनाम मध्ये झाला.
  • राजकीयपक्ष : व्हिएतनाम कम्युनिस्ट पार्टी

प्रभाकर राघवन ‘गुगलचे नवे ‘सीटीओ

  • ‘एआय’ मधीलवाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘गुगल’ तर्फे टीमच्या पुनर्रचनेवर भर देण्यात आला आहे.
  • त्याचाचएक भाग म्हणून भारतीय वंशाचे प्रभाकर राघवन कंपनीचे नवे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) बनले आहेत.
  • ‘एआय’ मध्ये’गुगल’ समोर ‘मायक्रोसॉफ्ट’चे आव्हान उभे ठाकले आहे.
  • राघवनयांनी अल्गोरिदम, वेब सर्च आणि डेटाबेसवर त्यांचे 20 वर्षांहून अधिक संशोधन केले आहे.
  • त्यांचे100 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. 12 वर्षांपूर्वी ते कंपनीत रुजू झाले.
  • गुगलसर्च, असिस्टंट, कॉमर्स आणि पेमेंट प्रॉडक्ट इत्यादी विभागात त्यांनी काम केले आहे.
  • राघवनयांनी भोपाळ, चेन्नई आणि मँचेस्टरमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी भोपाळच्या कॅम्पियन स्कूलमधून शालेय शिक्षण आणि आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले.
  • राघवनआणि पिचाई दोघेही सारखेच. दोघेही दक्षिण भारतीय आहेत. दोघांनीही आयआयटी मद्रासमधून शिक्षण घेतले आहे.
  • राघवनयांनी यूसी बर्कले येथून पीएचडी केली आहे.

धर्मा प्रॉडक्शन मध्ये पूनावालांची भागीदारी

  • प्रसिद्धदिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ आणि ‘धर्माटिक एंटरटेन्मेंट’ या दोन्ही कंपन्यांमधील 50 टक्के हिस्सेदारी ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे सीईओ आदर पूनावाला यांची ‘सेरेन प्रॉडक्शन’ ही कंपनी खरेदी करणार आहे.
  • एकहजार कोटी रुपयांत हा करार होणार आहे.
  • याकरारानंतर ‘धर्मा प्रॉडक्शन्स’मध्ये करण जोहर यांचा जवळपास 50 टक्के हिस्सा राहील.
  • ‘धर्माप्रॉडक्शन्स’मध्ये करण यांची07 टक्के आणि आई हिरू जोहर यांची 9.24 टक्के हिस्सेदारी आहे.
  • करारानंतरकरण जोहर कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहतील आणि अपूर्व मेहता मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कायम राहतील.
  • ‘प्रेक्षकांनाखिळवून ठेवणारी हृदयस्पर्शी कथानके ही धर्मा प्रॉडक्शन्सची ओळख आहे.
  • ‘धर्मा प्रॉडक्शन्स’ची स्थापना करण जोहर यांचे वडील यश जोहर यांनी 1976 – मध्ये केली.
  • ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘गुड न्यूज’ आणि ‘ब्रह्मास्त्र’  (भाग 1) आदी लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती संस्थेने केली आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *