हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन सारखे खेळ राष्ट्रकुल स्पर्धेतून बाद
- दोनवर्षांनंतर होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा पार पाडण्यासाठी खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने राष्ट्रकुल 2026 ग्लासगो संयोजन समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
- यानिर्णयामुळे सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे कारण भारताने याच खेळात सर्वाधिक पदके जिंकली आहेत
- यास्पर्धा रद्द होण्याच्या वाटेवर असतानाच ग्लासगो शहराने अगदी ऐनवेळेस या स्पर्धा घेण्याची तयारी दर्शवली.
- कमीखर्चात या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संयोजन समितीने स्पर्धेतील नेहमीच्या 19 क्रीडा प्रकारांऐवजी स्पर्धा 10 क्रीडा प्रकारात घेण्याचा निर्णय घेतला.
- संयोजनसमितीच्या झालेल्या बैठकीत वगळण्यात आलेल्या खेळांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती ,क्रिकेट आणि नेमबाजी या खेळांसह टेबल टेनिस, स्क्वाश आणि ट्रायथालोन या खेळांवर संयोजन समितीने फुली मारली आहे.
- राष्ट्रकुलस्पर्धेची ही 23 वी आवृत्ती राहणार असून स्पर्धा 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.
- ग्लासगोयेथे 12 वर्षांनी स्पर्धा पार पडणार आहे.
या खेळांचा असणार समावेश
- अॅथलेटिक्सआणि पॅराॲथलेटिक्स, जलतरण, पॅराजलतरण, आर्टिस्टिक जिमनॅस्टिक, ट्रॅक सायकलिंग, पॅराट्रॅक सायकलिंग, नेटबॉल, वेटलिफ्टिंग, पॅरापॉवरलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युदो, बॉल्स, पॅराबॉल्स, 3×3 बास्केटबॉल, 3×3 व्हिलचेअर बास्केटबॉल
- स्पर्धेचाकालावधी : 23 जुलै ते 2 ऑगस्ट 2026
- ठिकाण: ग्लासगो(स्कॉटलंड)
- स्पर्धेचीठिकाणे :स्टॉट्सटाउन स्टेडियम, टोलक्रॉस आंतरराष्ट्रीय जलतरण केंद्र, अमिराती संकुल
अरुणाचल प्रदेशात ड्रोनद्वारे टपाल
- अरुणाचलप्रदेशात ड्रोनद्वारे टपाल वितरणाच्या प्रयोगाची चाचणी टपाल विभागाने सुरू केली आहे.
- अतिदुर्गम, डोंगराळभागांमध्ये पोस्टमन पाठविण्याऐवजी ड्रोनद्वारे टपाल पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- चौखामटपाल कार्यालयातून 21 ऑक्टोबर रोजी सकाळी40 वाजता ड्रोन टपाल घेऊन निघाले. ते 11.02 वाजता वाकरो शाखा कार्यालयात पोहोचले. तेथून 11.44 वाजता निघून ड्रोन 12.08 वाजता पुन्हा चौखामला पोहोचले.