Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी

न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी

आरसीपी  यांची नवीन पक्षाची घोषणा

  • बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय रामचरण प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांनी नवीन पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा  केली.
  • ‘आप सबकी आवाज’ असे त्यांच्या पक्षाचे नाव असेल.
  • दिवाळीसोबत सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असल्याने  पक्षस्थापनेसाठी मुहूर्त निवडल्याचे त्यांनी सांगितले.
  • पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 243 पैकी 140 जागांवर निवडणूक लढवण्याची संकेत दिले.
  • प्रशासकीय अधिकारी राहिलेले आरसीपी सिंह यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला होता.

लालेंगमाविआ मिझोरामचे मुख्य सचिव

  • एच. लालेंगमाविआ यांची कार्यवाहक मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली.
  • विद्यमान मुख्य सचिव रेणू शर्मा यांच्या निवृत्तीच्या एका दिवसापूर्वी लालेंगमाविआ कार्यवाहक मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारतील.
  • लालेंगमाविआ सध्या पर्यावरण, वन आणि
  • हवामान बदल, उच्च आणि तांत्रिक शिक्षण आणि मत्स्य विभागांमध्ये आयुक्त आणि सचिव म्हणून कार्यरत आहे.

कुकुर तिहार उत्सव

  • कुकुर तिहार हा नेपाळमधील एक उत्सव आहे.
  • हा उत्सव मानव आणि कुत्र्यांमधील विशेष संबंध साजरा करतो. या दिवशी कुत्र्यांना पूजा केली जाते, त्यांच्यावर टिका लावली जाते, गळ्यात झेंडूच्या हार घालून त्यांची पूजा केली जाते.
  • या दिवशी कुत्र्यांना स्वादिष्ट अन्न दिले जाते.
  • पोलीस कुत्रे आणि भटक्या कुत्र्यांनाही सन्मानित केले जाते.
  • या दिवशी कुत्र्याशी अनादराने वागणे पाप मानले जाते.
  • नेपाळमध्ये दीपावलीत दुसरा दिवस कुकुर तिहार उत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यात मानवाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या श्वानांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला जातो.

काँगरे चक्रीवादळ

  • तैवानमध्ये काँग-रे चक्रीवादळ शक्तिशाली वादळामुळे शाळा आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
  • या वादळामुळे पूर्व किनारपट्टीवर जोरदार वारे आणि पूर आला असून देशाच्या उत्तरेकडील विमान उड्डाणे आणि रेल्वेसेवा स्थगित करण्यात आली आहे.
  • जवळपास 8600 लोकांना निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. हे वादळ ताइतुंगच्या पूर्वेकडे काउंटीमधून पुढे सरकले असताना त्याचा वेग ताशी 184 किमी इतका होता.तर 227 किमी प्रतितास वेगाने हे वारे वाहत होते.

न्यूयॉर्कमधील शाळांना पहिल्यांदाच दिवाळीची सुट्टी

  • न्यूयॉर्कमधील सार्वजनिक शाळांना इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
  • यामुळे 1 दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांना दिवाळी सण साजरा करता येणार आहे.
  • गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी शहरातील सार्वजनिक शाळांना दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.
  • यानुसार येत्या 1 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरातील शाळा बंद राहणार आहेत.

 ‘बीपीएलचे संस्थापक नम्बियार यांचे निधन

  • ब्रिटिश फिजिकल लॅबोरेटरीज (बीपीएल) समूहाचे संस्थापक टी. पी. गोपालन नम्बियार  यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.
  • इलेक्ट्रॉनिक्स उद्योगविश्वात नम्बियार हे ‘टीपीजी’ या टोपणनावाने ओळखले जात.
  • त्यांनी 1963 मध्ये बीपीएल समूहाची स्थापना केली.
  • भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे नम्बियार हे सासरे आहेत.
  • बीपीएल समूह वैद्यकीय यंत्रे, टेलिव्हिजन संयंत्रे, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, ऑडिओ उपकरणे आणि वातानुकूलन यंत्रे यांचे उत्पादन करतो.
  • या समूहाचे एकूण उत्पन्न 50कोटी रुपये आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *