संजय वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून हटवून त्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. त्यानंतर, 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर संजय वर्मा यांची राज्याचे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
- निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश काढल्यानंतर लगेचच वर्मा यांनी कार्यभार स्वीकारला.
- वर्मा 1990 च्या तुकडीचे अधिकारी असून कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते.
- त्यांनी कोल्हापूरमध्ये महानिरीक्षकपदाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यावेळी, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्वही वर्मा यांनी केले होते.
- याशिवाय वर्मा चार वर्षे म्हाडाच्या दक्षता विभागात कार्यरत होते .
- त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयात काही काळ कार्यरत होते .
- महासंचालक कार्यालयातून वर्मा यांनी राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- ते मुळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातून शिक्षण घेतले.
- एप्रिल 2028 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत.
पुणे पालिकेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
- ‘आयईईई स्मार्ट सिटीज टेक्निकल कम्युनिटी’तर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येणाऱ्या ‘इमर्जिंग इकॉनॉमी – लेगसी सिटीज’ श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पुणे महापालिकेच्या ‘पीएमसी केअर’ या ऑनलाइन सेवेला प्रदान करण्यात आला.
- थायलंडमधील पटाया शहरात 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान ‘आयईईई इंटरनॅशनल स्मार्ट सिटीज’ची परिषद झाली.
- या ठिकाणी महापालिका आयुक्त तसेच प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्या वतीने फॉक्सबेरी टेक्नॉलॉजिजचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित भार्गव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- या परिषदेसाठी जगभरातून 250 प्रकल्पांची निवड झाली होती. त्यातून अंतिम फेरीसाठी सात प्रकल्पांचे मूल्यमापन झाले.
- यात ‘पीएमसी केअर’ प्रमाणेच पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या दोन प्रकल्पांचा समावेश होता.
- पुणे महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग असावा, महापालिकेच्या विविध सेवा-सुविधा मोबाईल अॅप्लिकेशन आणि पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी हे ‘अॅप’ नव्या स्वरूपात विकसित करण्यात आले.
- या ‘अॅप’च्या माध्यमातून तक्रार निवारण, मालमत्ता करासह मनपाचे सर्व कर ऑनलाइन भरण्याची सुविधा, पाणीपुरवठा बंदच्या सूचनेसह पुणे महापालिकेतील घडामोडींची माहिती, नागरिकाभिमुख सेवांची माहिती दिली जाते. त्याचा फायदा शहरातील लाखो नागरिकांना होत आहे.
- या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.
‘पीएमसी केअर‘मधील प्रमुख सेवा
- तक्रार निवारण
- मालमत्ता करासह मनपाचे सर्व कर ऑनलाइन भरण्याची सुविधा
- पाणीपुरवठा बंद राहण्याच्या सूचनेसह इतर माहिती देणे
- मनपाच्या नागरिकाभिमुख सेवांची माहिती
- पुणे शहरातील घडामोडींविषयी माहिती देणे